काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मेडिक्लेम कंपन्यांनीही लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:52+5:302021-07-24T04:21:52+5:30
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांची प्रकृती गंभीर हाेत असल्याने उपचारासाठी लाखाे रुपये खर्च हाेत हाेते. या काळात काही आराेग्य कंपन्यांनी ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांची प्रकृती गंभीर हाेत असल्याने उपचारासाठी लाखाे रुपये खर्च हाेत हाेते. या काळात काही आराेग्य कंपन्यांनी काेराेना राेगावरील उपचारासाठी मेडिक्लेम पाॅलिसीज सुरू केल्या हाेत्या. काेराेनामुळे धास्तावलेल्या अनेक नागरिकांनी मेडिक्लेम पाॅलिसी काढली हाेती. प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार मेडिक्लेम पाॅलिसी काढली. मात्र, प्रत्यक्षात कमी प्रमाणात लाभ देण्यात आला असल्याची अनेक रुग्णांची तक्रार आहे.
बाॅक्स
विमा रकमेत केली जाते कपात
१) जेवढ्या रकमेचा मेडिक्लेम काढण्यात आला आहे. तेवढ्या रकमेपर्यंतचे रुग्णालयाचे बिल सादर केल्यास तेवढे बिल मंजूर करून तेवढे भुगतान संबंधित व्यक्तीला देणे अपेक्षित आहे.
२) काही कंपन्या जेवढे बिल मंजुरीसाठी टाकले जाते तेवढा दावा मंजूर करतात. यामध्ये भारतातील काही प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे.
३) काही कंपन्या मात्र विविध कारणे पुढे करून कमी प्रमाणात दावा मंजूर करतात.
बाॅक्स
ही घ्या उदाहरणे
केस १. काेराेना राेगाबाबतच मी मेडिक्लेम केला हाेता. मात्र, कंपनीने ठरवून दिलेल्या वेळेपूर्वीच तुम्हाला काेराेना झाला आहे. त्यामुळे दावा मंजूर हाेऊ शकत नाही, असे कंपनीने कारण सांगण्यात आले असल्याचे एका मेडिक्लेम काढलेल्या व्यक्तीने सांगितले.
केस २. तुम्ही मेडिक्लेमच कमी काढला असल्याचे सांगून बिल सादर केल्याच्या तुलनेत केवळ ६० टक्केच रक्कम मंजूर केला आहे.
बाॅक्स
दुसऱ्या लाटेत काेराेना रुग्णांवर उपचार-३२४
किती जणांचा मेडिक्लेम- ५४