स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:41 AM2021-08-28T04:41:14+5:302021-08-28T04:41:14+5:30

विविध मागण्यांची पूर्तता १० सप्टेंबर २०२१ पर्यंत न झाल्यास ऑक्टाेबर २०२१ च्या अन्नधान्याची उचल करणार नाही, अशा इशारा संघटनेमार्फत ...

Meet the demands of cheap grain shoppers | स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या निकाली काढा

स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या निकाली काढा

Next

विविध मागण्यांची पूर्तता १० सप्टेंबर २०२१ पर्यंत न झाल्यास ऑक्टाेबर २०२१ च्या अन्नधान्याची उचल करणार नाही, अशा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत असतात, परंतु त्या बदल्यात आमच्या पदरी निराशाच आली आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांनी चलान भरून मोफत धान्य वाटप केलेले पैसे कमिशनसहित जमा करावे, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० मध्ये वाटप केलेल्या धान्याचे कमिशन देण्यात यावे, दुकानदाराच्या खात्यात १० सप्टेंबर २०२१ पर्यंत कमिशन जमा न झाल्यास ऑक्टोबर २०२१ च्या अन्नधान्याची उचल करणार नाही. तसेच ऑक्टोबरचे धान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध न झाल्यास त्यास स्वस्त धान्य दुकानदार जबाबदार राहणार नाहीत, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना जाकीर कुरेशा, सचिव नरेन्द्र उईके, समीर कुरेशा, जमिग शेख आदी हजर हाेते.

260821\58311957-img-20210826-wa0046.jpg

तहसीलदार पिततुळवार याना निवेदन

Web Title: Meet the demands of cheap grain shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.