घरकूल निधी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गाजली विभागांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:51+5:30
बैठकीत घरकुलाचा प्रलंबित निधी लवकर देणे, शेतकऱ्यांना अतिक्रमणाचे वनहक्क पट्टे देणे, कृषिपंपांना वीज कनेक्शन देणे, राेजगार हमी याेजनेची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणे आदी प्रमुख मुद्द्यांसह अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील प्रमुख विभागाच्या कामांचा आढावा खा. अशाेक नेते यांनी २८ ऑक्टाेबर राेजी पंचायत समितीच्या सभागृहात घेतला. याप्रसंगी तालुक्यातील मंजूर घरकुलांचा निधी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या आदी मुद्द्यांवर सभा गाजली. खासदारांनी अधिकाऱ्यांना विविध विकासकामे लवकर मार्गी लावावीत व सूचनांचे पालन करावे, असे निर्देश दिले.
बैठकीला पं. स. सभापती अनुसया कोरेटी, जि. प. सदस्य लता पुंघाटे, नायब तहसीलदार वाकुडकर, बीडीओ एम. ई. कोमलवार, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे, भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, साईनाथ साळवे, भाजप तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत घरकुलाचा प्रलंबित निधी लवकर देणे, शेतकऱ्यांना अतिक्रमणाचे वनहक्क पट्टे देणे, कृषिपंपांना वीज कनेक्शन देणे, राेजगार हमी याेजनेची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणे आदी प्रमुख मुद्द्यांसह अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील प्रमुख विभागातील अधिकारी हजर हाेते.