आलापल्लीत राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:56 AM2018-04-15T00:56:32+5:302018-04-15T00:56:32+5:30

आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्षा तथा विद्यमान जि.प.चे बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, अहेरी पं.स. सदस्य हर्षवर्धन आत्राम,......

A meeting of NCP Congress in Aleppali | आलापल्लीत राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा

आलापल्लीत राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा

Next
ठळक मुद्देअनेक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश : धर्मरावबाबा आत्राम यांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्षा तथा विद्यमान जि.प.चे बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, अहेरी पं.स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, इरफान खान, शैलेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, पक्षातून काही कार्यकर्ते निघून गेले असतील तर जावू द्या, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकमेकांचे हेवेदावे बाजूला सारून आता पासूनच कामाला लागावे. असे आवाहन केले. माजी आमदार दीपक आत्राम व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून सत्तारुढ भाजपा पक्षावर सडकून टीका केले.
याप्रसंगी बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी खास करून महिलांमध्ये एकजुटीची मोठी ताकद असून या ताकदीचा व नारीशक्तीचा उपयोग मिशन २०१९ मध्ये करावा. पक्षाला मजबूत करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांनी तर संचालन गजानन लोनबले यांनी केले. मेळाव्यात अनेक महिला, युवक, युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या मेळाव्याला आलापल्ली, नागेपल्ली व परिसरातील राकाँचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: A meeting of NCP Congress in Aleppali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.