आरमाेरीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:40 AM2021-08-19T04:40:12+5:302021-08-19T04:40:12+5:30
आरमाेरी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शनिवारी येथील पॅराडाइज इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये ...
आरमाेरी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शनिवारी येथील पॅराडाइज इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये बैठक पार पडली.
या बैठकीला प्रामुख्याने माजी आमदार तथा जिल्हा संघटक डॉ. रामकृष्ण मडावी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुनील पाेरेड्डीवार, आरमाेरी विधानसभा संघटक राजू अंबानी, जिल्हा संघटक श्रीकांत बन्साेड, धानाेरा तालुकाप्रमुख शेखर उईके, आरमाेरी तालुकाप्रमुख महेंद्र शेंडे, निराधार समितीचे अध्यक्ष चंदू वडपल्लीवार, जिल्हा नियाेजन समितीच्या सदस्य कल्पना तिजारे, अशोक माडावार, विलास ठाकरे आदी उपस्थित हाेते.
या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, मजुरांच्या समस्या, शेतीविषयी समस्या आदी बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या बैठकीला माजी पंचायत समिती सभापती भजन मडकाम, लक्ष्मण सहारे, मोरेश्वर चेलिरवार, विजय मुर्वतकर, दिलीप मेश्राम, बाबूराव सेलोटे, हिरामण मातेरे, गणेश तिजारे, धनंजय इन्कने, चंद्रलाल बनकर, लोमेश नैताम, डोमाजी भोयर, संतोष मेश्राम, खुशाल बांडे, लोमेश सहारे, प्रवीण ठेंगरी, संतोष चंदनखेडे, मोरेश्वर मेश्राम, यादव ठाकरे, उमेश हर्षे, लोचन मेश्राम, विद्या मेश्राम, ज्योती घाटूरकर, सुनंदा शेंदरे, मनीषा नेवारे, सुशीला कोल्हे, प्रतिभा कोल्हे, मीरा शेंदरे, चेतना घाटूरकर, संगीता नंदुरकर, निरू गोवर्धन आदी पदाधिकारी तसेच आरमाेरी तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
बाॅक्स ........
ऐकून घेण्यात आले कार्यकर्त्यांचे म्हणणे
- या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे पक्ष संघटन व आगामी निवडणूक माेर्चेबांधणी तसेच पक्षप्रवेश, विविध उपक्रम आदींबाबतचे म्हणणे ऐकून घेतले.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आहे. दरम्यान, शासनाच्या विविध याेजना सर्वसामान्यांपर्यंत पाेहाेचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी उचलावी, असे सांगण्यात आले.