आराेग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:56+5:302021-09-15T04:42:56+5:30
गडचिराेली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत आराेग्य सेवकांसह सर्व आराेग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आपण जिल्हा परिषदेमध्ये लवकरच ...
गडचिराेली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत आराेग्य सेवकांसह सर्व आराेग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आपण जिल्हा परिषदेमध्ये लवकरच आराेग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलाविणार, अशी ग्वाही गडचिराेलीचे नवनियुक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ.संजयकुमार जठार यांनी आराेग्य कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला साेमवारला दिली.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा माता व बालसंगाेपन अधिकारी डाॅ.बन्साेडे, जिल्हा साथराेग अधिकारी डाॅ.विनाेद म्हशाखेत्री, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.सुनील मडावी, जिल्हा नाेडल अधिकारी पंकज हेमके आदी उपस्थित हाेते. यावेळी शिष्टमंडळामध्ये राष्ट्रसेवा आराेग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगीरथ काेठारे, सचिव देवेंद्र नगराळे, प्रमुख सल्लागार गुणवंत शेंडे, उमाकांत सातपुते आदी उपस्थित हाेते.
याप्रसंगी संघटनेच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ.जठार यांच्यासह डाॅ.समीर बन्साेडे, डाॅ.सुनील मडावी, जिल्हा साथराेग अधिकारी डाॅ.विनाेद म्हशाखेत्री आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आराेग्य कर्मचारी उपस्थित हाेते. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आराेग्य व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.
बाॅक्स..
सकारात्मक प्रतिसाद
नवे डीएचओ डाॅ.जठार यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. आराेग्यसेवक पुरुष संवर्गाच्या प्रलंबित सेवाविषयक समस्या व मागण्या मार्गी लावण्यासाठी विस्तृत चर्चा करण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने बैठक लावून कार्यवाही करण्यात येईल, असे डाॅ.जठार यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.