ओबीसी महामोर्चाच्या तयारीसाठी वैरागडमध्ये सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:25+5:302021-02-10T04:37:25+5:30
ओबीसी प्रवर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून हक्काचे आरक्षण घेण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा महामोर्चा काढण्यात ...
ओबीसी प्रवर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून हक्काचे आरक्षण घेण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गावागावात सभेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना महामोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विजय गुरनुले, उपाध्यक्ष रमेश पगाडे, ओमप्रकाश मने, कोषाध्यक्ष दत्तू सोमनकर, सचिव नेताजी बोडणे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र तावेडे, दत्तात्रय हर्षे, रमेश लांजीकर, कुसन बनकर, मोहन खरवडे, राजकुमार नंदरधने, रमेश बोडणे, दिवाकर खरवडे, मोरेश्वर पगाडे, अजय सोमनकर, एकनाथ गोटेफोडे, संजय खंडारकर, दामोधर लांजेवार, अमोल हर्षे, सुधाकर लांजेवार, लोमेश खंडारकर आदी उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष विजय गुरनुले म्हणाले, ओबीसींची जनगणना करून लोकसंख्येच्या पटीत आरक्षण द्यावे. या देशात पशु पक्ष्यांची गणना होते. मात्र, या देशातील मूळ रहिवासी असलेल्या बहुसंख्य ओबीसींची जनगणना होत नाही. यावरून ओबीसींना जनावारांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक मिळत असून, हा अन्याय सहन करायचा नाही, असे सांगितले.