नक्षल्यांकडून हत्या झालेल्या उपसरपंचाचे उभारले स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:52 PM2018-02-25T23:52:34+5:302018-02-25T23:52:34+5:30
जिमलगट्टा परिसरातील दामरंचा येथील उपसरपंच पत्रू दुर्गे यांची नक्षल्यांनी २०१५ मध्ये नक्षल्यांनी हत्या केली होती. गावातील नागरिकांनी एकत्र येत पत्रू दुर्गे यांचे लोक सहभागातून गावात स्मारक उभारले आहे.
ऑनलाईन लोकमत
जिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरातील दामरंचा येथील उपसरपंच पत्रू दुर्गे यांची नक्षल्यांनी २०१५ मध्ये नक्षल्यांनी हत्या केली होती. गावातील नागरिकांनी एकत्र येत पत्रू दुर्गे यांचे लोक सहभागातून गावात स्मारक उभारले आहे. विशेष म्हणजे, या स्मारकावर नक्षलपीडित असा उल्लेख करण्यात आला आहे.
पत्रू दुर्गे यांनी उपसरपंच पदावर कार्यरत असताना गावाच्या विकासासाठी अनेक केले. गावात विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे पत्रू दुर्गे हे अल्पावधीतच गावातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. मात्र ही बाब नक्षल्यांना कदाचित मान्य नसावी. नक्षल्यांनी पत्रू दुर्गे यांची हत्या केली. पत्रू दुर्गे यांच्या मृत्यूमुळे दामरंचा गावाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला व्हावी, या उद्देशाने गावातील नागरिकांनी वर्गणी गोळा केली. या वर्गणीतून गावातील विहिरीजवळच दुर्गे यांचे स्मारक बांधले. या स्मारकाचे विधीवत पूजन २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले. गावातील आबालवृध्दांनी पत्रू दुर्गे यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्याचबरोबर नक्षल्यांच्या कृत्याचा गावकºयांनी निषेध केला.