राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली
By admin | Published: October 21, 2016 01:18 AM2016-10-21T01:18:48+5:302016-10-21T01:18:48+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून गुरूवारी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुण्यतिथी सप्ताह : सर्वधर्म परिषदेदरम्यान मार्गदर्शन
गडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून गुरूवारी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर, समाजसेवक देवाजी तोफा, डॉ. एस. बी. कुंभारे, जयराम खोब्रागडे, अरविंद वासेकर, डॉ. मुरलीधर बद्दलवार, मंगलसिंग पटवा, अशोक गडकरी, पंडित पुडके, बारापात्रे, बाळासाहेब बाळेकरमकर, प्रशांत कामकर, डोमाजी झरकर, बापूजी गेडाम, प्रकाश गाठे, राहुल आंबोरकर आदी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतंत्र लढ्याच्या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भजनांच्या माध्यमातून देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. भजनांच्या माध्यमातून पाखंडी, भोंदू नागरिकांवर प्रहार केला. ग्रामीण भागातील जनतेला अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले. राष्ट्रसंतांचे विचार ५० वर्षानंतरही तंतोतंत जुडतात. राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक नागरिकामध्ये रूजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.