तेलंगणाकडून सिरोंचा तालुक्यात प्रवासी सर्वेक्षण
By Admin | Published: January 6, 2017 01:34 AM2017-01-06T01:34:09+5:302017-01-06T01:34:09+5:30
तेलंगणाची बससेवा गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यासाठी गुरूवारी तेलंगणा राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची
पुलामुळे आवागमनात वाढ : नव्या बसगाड्या सुरू होणार
अंकिसा : तेलंगणाची बससेवा गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यासाठी गुरूवारी तेलंगणा राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची बस सिरोंचा, अंकिसा, आसरअल्ली, पातागुडमपर्यंत पोहोचली. या बसमधील अधिकाऱ्यांनी मार्ग व प्रवाशी मिळतील काय याची चाचपणी केली.
गोदावरी नदीवरील पुलाच्या लोकार्पणाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली-हैदराबाद बससेवा सुरू केली. गोदावरी पुलामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे तेलंगणा राज्यात आवागमन वाढले आहे. त्याचबरोबर तेलंगणा राज्यातीलही नागरिक सिरोंचा तालुक्यात नातेवाईकांकडे येत आहेत. त्यामुळे बसला प्रवाशी मिळू शकतात. मार्ग तसेच प्रवाशी मिळण्याबाबतची चाचपणी करण्यासाठी तेलंगणाची बस सिरोंचा तालुक्यात गुरूवारी पोहोचली. सदर बसमधील अधिकाऱ्यांनी केवळ पातागुडमपर्यंतचे सर्वेक्षण केले असले तरी तेलंगणाच्या बसेस आणखी दुर्गम भागापर्यंत बससेवा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. (वार्ताहर)