मकावर लष्करी अळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:34+5:30
लष्करी अळ्या पान खाऊन पिकांचे नुकसान करतात. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पाण्याचा हिरवा पापुद्रा खातात. दुसºया ते तिसºया अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. या अळ्या मक्याच्या पोंग्यात राहून पानाला छिद्र करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसून येतात. सर्वसाधारण झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मका पिकाची लागवड नुकतीच पार पडली आहे. मका पीक आता जवळपास फूटभर उंचीचे झाले आहे. या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आली आहे.
मुलचेरा, चामोर्शी व अहेरी तालुक्यात मका पिकाची लागवड केली जाते. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील तसेच कृषी सहायक यांनी मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली चेक येथील शामलदास नगर यांच्या शेतावर १४ नोव्हेंबर रोजी भेट दिली असता, मका पिकावर ७० टक्के पेक्षा अधिक लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वाढीच्या अवस्थेत होतो. शेतकऱ्यांनी मका पिकाचे सर्वेक्षण करून पाच टक्के पेक्षा अधिक झाडे प्रादुर्भावग्रस्त आढळून आल्यास कीड नियंत्रणाचे त्वरीत करावे. या अळीची ३० दिवसात एक पिढी पूर्ण होते. हिवाळ्यात हा कालावधी दोन महिनेपर्यंत लांबू शकतो. एका वर्षात अखंड खाद्य मिळाल्यास तीन ते चार पिढ्या विविध वनस्पतींवर पूर्ण होऊ शकतात. एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पतंगांची संख्या विपुल प्रमाणात दिसून येते.
लष्करी अळ्या पान खाऊन पिकांचे नुकसान करतात. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पाण्याचा हिरवा पापुद्रा खातात. दुसºया ते तिसºया अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. या अळ्या मक्याच्या पोंग्यात राहून पानाला छिद्र करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसून येतात. सर्वसाधारण झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात. मोठ्या प्रमाणात पाने खाल्याने केवळ झाडाचे मुख्य खोड किंवा पानाच्या शीरा शिल्लक राहतात. झाड फाटल्यासारखे दिसते. अशी स्थिती दिसून आल्यास वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिकाचे मोठे नुकसान
मका पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. याच अवस्थेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटते. तसेच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पीक नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करीत राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
पिकाचे मोठे नुकसान
मका पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. याच अवस्थेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटते. तसेच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पीक नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करीत राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
असे करा किडीचे व्यवस्थापन
पतंगावर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबरच प्राधान्याने पोंगे धारण अवस्थेत लावावे. टायपोग्रामा प्रजाती, टेलेमोनस, रेमन्स या परोपजीवी किटकांचे एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. चार ते पाच दिवस रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. डायमेट ३० टक्के, १२.५० मिलि किंवा थायमेथोक्झाम १२.६० टक्के, लॅब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के, २.५ मिलि किंवा क्लोरॅट्रॅलीनीप्रोल १८.५ टक्के, ३ मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. कारबोफ्युरॉन ३ टक्के दानेदार ३३ किलो प्रती हेक्टर किंवा फोरेट १० टक्के दानेदार १० किलो प्रती हेक्टर फवारावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.