मिलच्या पट्ट्यात सापडून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:51 AM2018-02-17T00:51:51+5:302018-02-17T00:52:27+5:30

धान पिसाईसाठी गावातील राईसमिलमध्ये गेलेल्या महिलेच्या साडीचा पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दितील कोतापल्ली येथे घडली.

Milk collapsed in women's belt and killed them | मिलच्या पट्ट्यात सापडून महिला ठार

मिलच्या पट्ट्यात सापडून महिला ठार

Next
ठळक मुद्देराईसमिल मालकावर गुन्हा : कारवाईसाठी तहसीलवर ग्रामस्थांची धडक

ऑनलाईन लोकमत
सिरोंचा : धान पिसाईसाठी गावातील राईसमिलमध्ये गेलेल्या महिलेच्या साडीचा पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दितील कोतापल्ली येथे घडली.
दुर्गक्का कतरताला दुर्गम (५५) असे मृतक महिलेचे नाव आहे. दुर्गक्का व कतरताला हे दोघे पतीपत्नी, सम्मी रेड्डी यांच्या मालकीच्या गावातील राईसमिलवर धान पिसाईसाठी गेले. सदर महिला ही धान आणून देत होती. दरम्यान तिच्या साडीचा पदर राईसमिलच्या पट्ट्यात अडकला. यात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर ५० ते ६० ग्रामस्थांनी सिरोंचाचे तहसील कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. आसरअल्ली पोलीस ठाण्यात राईसमिल मालक सम्मी रेड्डी यांच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राईसमिल मालक फरार आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार गावडे करीत आहेत.

Web Title: Milk collapsed in women's belt and killed them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.