वेळेत भरडाई न करणाऱ्या मिलर्सना पुढील हंगामात काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:16+5:302021-05-28T04:27:16+5:30

गडचिरोलीमध्ये उर्वरित धान भरडाईची समस्या व इतर प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पाटील आले होते. या बैठकीत त्यांनी राईस मिलधारकांच्या विविध ...

Millers who don’t rush in time don’t have a job next season | वेळेत भरडाई न करणाऱ्या मिलर्सना पुढील हंगामात काम नाही

वेळेत भरडाई न करणाऱ्या मिलर्सना पुढील हंगामात काम नाही

Next

गडचिरोलीमध्ये उर्वरित धान भरडाईची समस्या व इतर प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पाटील आले होते. या बैठकीत त्यांनी राईस मिलधारकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. जिल्ह्यातील उर्वरित ११.५० लाख क्विंटल धान भरडाई १० जूनपूर्वी करण्याचे निर्देश त्यांनी राईस मिल मालकांना दिले. वेळेत भरडाई होत नसल्यामुळे समस्या निर्माण होतात. जिल्ह्यातील उघड्यावरील धान लवकर भरडाई झाल्यास पुढील हंगामातील धान साठवणुकीसाठी जागाही उपलब्ध होणार आहे.

या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील धान खरेदी व भरडाईबाबत माहिती दिली. बैठकीला मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक डॉ.अतुल नेरकर, टीडीसीचे महाव्यवस्थापक जयराम राठोड, पुरवठा शाखा

नागपूर विभागाचे उपायुक्त रमेश आळे, गडचिरोलीचे पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे व चंद्रपूरचे पुरवठा अधिकारी तसेच

जिल्ह्यातील राईस मिलमालक उपस्थित होते.

या बैठकीत प्रधान सचिव पाटील यांनी धान भरडाईबाबत मिल मालकांच्या मागण्या काही अंशी मान्य केल्या व उर्वरित धान भरडाई १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सदर भरडाई जलद गतीने करत असताना दुर्गम भागातील उचल अगोदर करावी, असेही निर्देश दिले. रबी हंगामातील धान ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार गोदामे भाड्याने घेण्याच्या

सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

(बॉक्स)

पालकमंत्री शिंदे यांनीही दिल्या सूचना

जिल्ह्यातील मका खरेदीबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिवांशी चर्चा केली. त्यांनी जिल्ह्यातील मका खरेदी करण्यासाठी लवकर निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले. तसेच जिल्ह्यातील उर्वरित धान भरडाई वेळेत केली तर पुढील हंगामातील धान साठवणुकीची प्रक्रिया सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले. धान साठवणुकीसाठी पुढील काळात इतर इमारती ताब्यात घेण्याचाही विचार करावा, अशा सूचना त्यांनी बैठकीत दूरध्वनीद्वारे दिल्या.

Web Title: Millers who don’t rush in time don’t have a job next season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.