लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:49 PM2017-09-01T23:49:48+5:302017-09-01T23:50:12+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरमोरी-गडचिरोली मार्गावरील खोब्रागडी नदीजवळ लाखो रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरमोरी-गडचिरोली मार्गावरील खोब्रागडी नदीजवळ लाखो रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. सदर कारवाई ३१ आॅगस्ट रोजी करण्यात आली.
शकील अकील शेख (२५) रा. जवाहर वार्ड देसाईगंज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शकील हा गडचिरोली येथे चारचाकी वाहनाच्या सहाय्याने सुगंधीत तंबाखू आणत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी खोब्रागडी नदीजवळ सापळा रचला. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात हिरव्या रंगाच्या पोत्यात ४० पॉकेट आढळून आले. त्याचबरोबर पांढºया रंगाच्या पोत्यात प्रती २०० सुगंधीत तंबाखू डब्बे आढळून आले. सदर कारवाई पोलीस हवालदार नरेश सहारे, उद्धव नरोटे, दुधराम चव्हारे, दुर्गा साखरे, प्रशांत कातकमवार यांनी केली आहे.
राज्यभरात सुगंधीत तंबाखू विक्रीवर बंदी असली तरी गडचिरोली जिल्ह्यात खर्रासाठी वापरला जाणारा सुगंधीत तंबाखूची विक्री खुलेआम होते. गडचिरोली शहरात सुध्दा अनेक पानठेल्यांवर खर्राची विक्री खुलेआम सुरू आहे.