पैशांपेक्षा मनाचा बॅलेंस महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:43 PM2017-12-18T23:43:22+5:302017-12-18T23:43:53+5:30

आपल्या मुलांना घडविताना त्यांच्यासाठी भरभक्कम बँक बॅलेंस ठेवण्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत मनाचा बॅलेंस शाबूत राहिल असे शिक्षण द्या,

Mind's balance is important than money | पैशांपेक्षा मनाचा बॅलेंस महत्त्वाचा

पैशांपेक्षा मनाचा बॅलेंस महत्त्वाचा

Next
ठळक मुद्देमनोज गोविंदवार यांचे प्रतिपादन : ‘लव्ह यू जिंदगी’ कार्यक्रमात जीवनशैलीवर मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : आपल्या मुलांना घडविताना त्यांच्यासाठी भरभक्कम बँक बॅलेंस ठेवण्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत मनाचा बॅलेंस शाबूत राहिल असे शिक्षण द्या, असे आवाहन करीत बँक बॅलेंसपेक्षाही मनाचा बॅलेंस महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते मनोज गोविंदवार यांनी केले.
लॉयन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने ‘लव्ह यू जिंदगी’ हा जीवनशैलीवर आधारित कार्यक्रम येथील सुमानंद सभागृहात रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी ते बोलत होते.
जीवन क्षणभंगूर आहे. आयुष्यात येणाºया प्रत्येक क्षणाचा आनंद घेत मस्तीत पण शिस्तीत जगलं पाहिजे. जीवनात येणाºया अडचणींना धाडसाने सामोरे जाण्याचे शिक्षण मुलांना दिले पाहिजे, असा संदेश गोविंदवार यांनी पालकांना यावेळी दिला. आपल्या आयुष्यात येणाºया क्षणांना सुखद करण्यात ज्यांचा वाटा आहे, त्या प्रत्येकाला धन्यवाद देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे गोविंदवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक मोरे, संचालन प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार सविता सादमवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लबचे दीपक मोरे, बाळासाहेब पद्मावार, सविता सादमवार, मदत जिवानी, देवानंद कामडी, भूजंगराव हिरे, विनय ढोले, घिसुलाल काबरा, नादीर भामानी, प्रभू सादमवार, स्मिता लडके, सुरेश लडके, मंजू मोरे, सुचिता कामडी, चेतन गोरे आदींनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी हजर होते.
अनेकांचे डोळे पाणावले
अपंग व आर्थिक दुर्बल असलेले पालकही आपल्या मुला-मुलींकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्यांना चांगले घडवितात. मात्र पैैसा, सामर्थ्य असूनही अनेक कुटुंबातील मुले-मुली चुकीच्या दिशेने वाटचाल करतात हे उदा. देऊन गोविंदवार यांनी सांगताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.

Web Title: Mind's balance is important than money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.