म्युकरमायकाेसिसवरील किमान खर्च ८ लाख, शासनाची मदत केवळ दीड लाखांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:41+5:302021-05-23T04:36:41+5:30
काेराेनातून बरे झालेल्या राज्यातील अनेक रुग्णांना म्युकरमायकाेसिस हा आजार झाल्याचे आढळून आले आहे. या राेगाचा संसर्ग झालेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही ...
काेराेनातून बरे झालेल्या राज्यातील अनेक रुग्णांना म्युकरमायकाेसिस हा आजार झाल्याचे आढळून आले आहे. या राेगाचा संसर्ग झालेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही उपचार घेता यावे, यासाठी शासनाने महात्मा फुले जनआराेग्य याेजनेत या राेगाचा समावेश केला. मात्र त्यासाठी संबंधित रुग्णाच्या उपचारासाठी रुग्णालयाला केवळ दीड लाख रुपयेच दिले जाणार आहेत. किमान खर्च ८ लाख रुपये असताना उर्वरित पैसे कुठून आणावे, असा प्रश्न पडला आहे.
काेट
माेठ्या प्रमाणात डायबिटिज असलेल्या रुग्णाला म्युकरमायकाेसिस या राेगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा राेग झालेल्या व्यक्तीला वेगळाच वास येण्यास सुरुवात हाेते. त्यावेळी रुग्णांनी डाॅक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. मागील आठ दिवसांत म्युकरमायकाेसिस सदृश लक्षणे असलेले जवळपास ५० रुग्ण तपासणीसाठी आले. त्यांची तपासणी केली असता एकालाही म्युकरमायकाेसिस हा आजार झाल्याचे आढळून आले नाही.
डाॅ. अद्वय अप्पलवार, नेत्रतज्ज्ञ, गडचिराेली
बाॅक्स
प्रथम टप्प्यात उपचार केल्यास कमी खर्च
-म्युकरमायकाेसिसची लागण झाल्याच्या पहिल्या टप्प्यात नाकात व ताेंडात खपल्या तयार हाेतात. वेगळाच वास येण्यास तयार हाेते. या कालावधीतच तपासणी करून राेगाचे निदान व उपचार केल्यास राेग कमी खर्चात बरा हाेऊ शकते.
-दुसऱ्या टप्प्यात डाेळ्यांवर सूज येणे व डाेळे फिरविता न येणे ही लक्षणे आढळून येतात.
-तिसऱ्या टप्प्यात हा राेग मेंदूपर्यंत पाेहाेचते. त्यावेळी उपचाराचा खर्च अधिक येते.
- या राेगावर गडचिराेलीतच तपासणी करून निदान हाेऊ शकते त्यासाठी जवळपास १० हजार रुपयांचा खर्च येते.
तपासणी केलेले रुग्ण- ५०