पुढील वर्षीच्या नियोजन प्रस्तावास लघुगटाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:29 AM2017-11-24T00:29:14+5:302017-11-24T00:29:24+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या लघुगट बैठकीत वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या प्रारु प आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या लघुगट बैठकीत वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या प्रारु प आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आली. लघुगटाचे प्रमुख आमदार कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चालू आराखडयात आजवर झालेल्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला. चालू वित्तीय वर्षाच्या नियतव्ययात शासनाने ३० टक्के कपात केली आहे. या पाशर््वभूमीवर सर्व विभागांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
आदिवासीबहुल जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख आहे. त्यामुळे आगामी वर्षाच्या नियोजन आराखड्यात आदिवासी देवी-देवतांची काही मंदिरे निवडून ती पर्यटन स्थळं म्हणून विकसित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी यावेळी दिले. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शान्तनु गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विपीन इटनकर व जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस. तिडके यांच्यासह जिल्हयातील सर्व कार्यालयांचे प्रमुख हजर होते.