दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:27 AM2020-12-27T04:27:12+5:302020-12-27T04:27:12+5:30
गडचिरोली शहरासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा नाही. नियमित कर्मचाऱ्यांमधूनच काही जणांकडे वाहतूक नियंत्रणाचे काम दिले जाते. ते कर्मचारी ...
गडचिरोली शहरासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा नाही. नियमित कर्मचाऱ्यांमधूनच काही जणांकडे वाहतूक नियंत्रणाचे काम दिले जाते. ते कर्मचारी वाहनांना अडवून तपासणीसुद्धा करतात. पण आरसा नाही म्हणून कोणाला दंड ठोठावल्याचे उदाहरण दिसत नाही.
आरशासाठी २०० रुपये दंडाची तरतूद
वाहतूक नियमानुसार प्रत्येक दुचाकी वाहनाला दोन्ही बाजुने आरसे असणे गरजेचे आहे. त्यापैकी एक आरसा नसेल तरीही २०० रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. अनेक वाहनधारक एकच आरसा ठेवतात तर बहुतांश लोक एकही आरसा ठेवत नाही.
दुचाकीचालकांना हे बंधनकारक
दुचाकी वाहन चालविताना नियमानुसार, वाहन चालविण्याचा परवाना, हेल्मेट, गाडीची कागदपत्रे, प्रदुषण नियंत्रणाचे प्रमाणपत्र, गाडीचाा विमा आदी बाबी आवश्यक आहेत. पण बहुतांश दुचाकीस्वार हे सर्व ठेवत नाही.
वाहतूक नियंत्रण विभागात मोजकेच कर्मचारी आहेत. कारवायांपेक्षा वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे सध्या त्यांना जास्त लक्ष द्यावे लागते. आरसे नसणाऱ्या दुचाकींवर कारवाया झाल्याची माहिती नाही.
- शरद मेश्राम
सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे.गडचिरोली