ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागणार होता; आमदारांनी स्वतःच्या गाडीमधून अपघातग्रस्तांना नेले रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 11:13 PM2021-07-23T23:13:25+5:302021-07-23T23:14:46+5:30
Krushna Gajbe news: ॲम्ब्युलन्ससाठी फोनही केला; पण ती येण्यास उशीर लागेल असे समजल्यामुळे त्यांनी स्वतःच्या वाहनात बसविले.
आरमोरी : तालुक्यातील देऊळगाव येथील एक युवक कुटुंबातील वृद्धेला घेऊन दुचाकीने जात असताना वाहन घसरून अपघात झाला. ते वेदनेने विव्हळत असतानाच तेथून जाणारे आमदार कृष्णा गजबे त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी लागलीच त्यांना आपल्या वाहनात बसवून रुग्णालयात भरती केले.
आ. गजबे शुक्रवारी आरमोरीवरून देसाईगंजकडे जात होते. या प्रवासात देऊळगाव येथील वयोवृद्ध सरिता पत्रे आणि युवक प्रकाश पत्रे यांच्या दुचाकीला अपघात झाल्याचे ते रस्त्यालगत पडले होते. गजबे यांनी लगेच गाडी थांबवली. ॲम्ब्युलन्ससाठी फोनही केला; पण ती येण्यास उशीर लागेल असे समजल्यामुळे त्यांनी स्वतःच्या वाहनात बसवून त्या अपघातग्रस्तांना आरमोरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. आपल्या वाढदिवसापासून आठवडाभर ते विविध उपक्रम राबवून सेवा सप्ताह साजरा करीत आहेत, हे विशेष.