वाघपीडित कुटुंबीयांचे आमदारांकडून सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:56+5:302021-09-14T04:42:56+5:30
राजगाटा माल येथील शाेभाबाई नामदेव मेश्राम यांचा २७ मार्च राेजी उन्हाळ्यात माेहफूल वेचताना वाघाने बळी घेतला, तर ११ सप्टेंबर ...
राजगाटा माल येथील शाेभाबाई नामदेव मेश्राम यांचा २७ मार्च राेजी उन्हाळ्यात माेहफूल वेचताना वाघाने बळी घेतला, तर ११ सप्टेंबर राेजी गणपत मंगरू भांडेकर यांचा वाघाने बळी घेतला. वाघपीडित दाेन्ही कुटुंबांचे आ. डॉ. देवराव होळी यांनी भेट देऊन सांत्वन केले, तसेच आर्थिक मदत देऊन शासनस्तरावरून मिळणाऱ्या मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी भाजप तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, जेप्रा येथील भाजप कार्यकर्ते देवानंद चलाख, गुणवंत जंबेवार, मारकबोडीचे माजी उपसरपंच रूपेश चुधरी उपस्थित होते.
बाॅक्स
वाघांचा बंदाेबस्त न केल्यास माेर्चा काढणार - छाया कुंभारे
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले राजगाटा माल येथील गणपत भांडेकर यांच्या कुटुंबाची शिवसेनेच्या माजी महिला संघटिका तथा माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे यांनी रविवारी भेट घेऊन सांत्वन केले, तसेच कुंभारे यांनी भांडेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहून कुटुंबाचे सांत्वन केले. या भागात १३च्यावर लोकांना वाघाने ठार केले आहे. भांडेकर हे १४ वे बळी आहेत; परंतु वनविभागाने अजूनही वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. लवकर बंदाेबस्त न केल्यास येत्या दाेन-तीन दिवसात वनसंरक्षकांच्या कार्यालयावर शेकडाे महिलांच्या वतीने माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा छाया कुंभारे यांनी दिला.
130921\13gad_1_13092021_30.jpg
पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देताना आ. डाॅ. देवराव हाेळी.