आमदारांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:51+5:302021-09-15T04:42:51+5:30
मागील चार पिढ्यांपासून गावंडे कुटुंबातर्फे महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. शंभर वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेली ही परंपरा गावंडे ...
मागील चार पिढ्यांपासून गावंडे कुटुंबातर्फे महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. शंभर वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेली ही परंपरा गावंडे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे विलास गावंडे यानी अद्यापही जपली आहे. श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतर महालक्ष्मीचा तीन दिवस गावंडे कुटुंबाकडे मुक्काम असतो. यावेळी शहरातील भाविक मोठ्या संख्येने महालक्ष्मीच्या दर्शनाकरिता गावंडे यांच्या घरी भेट देत दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात. सोमवारला आ. कृष्णा गजबे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, रवी समर्थ, माजी नगरसेवक ॲड. उमेश वालदे, भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, पुंडलिक देशमुख, संजय देशमुख, उपप्राचार्य प्रा. किशोर खोपे, प्रा. डॉ. दशरथ आदे, प्रा. डॉ. नरेन्द्र आरेकर, राकेश चव्हाण, उल्हास देशमुख व भाविक उपस्थित हाेते. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी साेमवारला भाविकांची रांग लागली हाेती.
140921\img20210913200049.jpg
कूरखेडा महालक्ष्मी चे दर्शन घेताना आमदार कृष्णा गजभे व अन्य भाविक