माेबाईलने ’मेमरी’ घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:58+5:302021-07-07T04:45:58+5:30

गडचिराेली : २० ते २५ वर्षांपूर्वी लहान मुलांसह वयाेवृद्ध नागरिकांना बऱ्याच गाेष्टी ताेंडपाठ राहत हाेत्या. मात्र, आधुनिक युगात माेबाईल ...

Mobile has run out of memory | माेबाईलने ’मेमरी’ घालविली

माेबाईलने ’मेमरी’ घालविली

Next

गडचिराेली : २० ते २५ वर्षांपूर्वी लहान मुलांसह वयाेवृद्ध नागरिकांना बऱ्याच गाेष्टी ताेंडपाठ राहत हाेत्या. मात्र, आधुनिक युगात माेबाईल क्रांतीने साऱ्यांनाच पाठांतर, स्मरणाचा विसर पडला आहे. परिणामी स्मार्टफाेनने माणसाची मेमरी बाद झाल्याचे दिसून येत आहे.

स्मार्टफाेन तसेच साध्या माेबाईलमध्ये विविध साेयी-सुविधा आहेत. माेबाईलमध्ये दिनांक, दिवस, गणकयंत्र, दिनदर्शिका, घड्याळ, आदींसह बऱ्याच बाबी आहेत. शिवाय इतरांशी संपर्क व संवाद साधण्याचे तसेच संबंध जुळवून ठेवण्याचे अनेक ॲप स्मार्टफाेनमध्ये आहेत. यामध्ये व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, आदींसह विविध प्रकारचे गेम, व्हाईस एसएमएस, ऑडिओ, व्हिडिओ, टाईपराईटर, गुगल मॅप, आदी आहेत.

विशेष म्हणजे, विविध प्रकारचे अत्याधुनिक प्रकारचे कॅमेरे आहेत. याचा उपयाेग आबालवृद्धांसह सारेच जण करतात. हाताच्या पंजाएवढ्या असलेल्या स्मार्टफाेनमध्ये विविध सुविधा व गाेष्टी असल्याने नागरिकांचे चिंतन, मनन, पाठांतर, मनन या बाबींकडे आपसुकच दुर्लक्ष झाले आहे. स्मार्टफाेनचा वापर विविध कामांसाठी प्रचंड वाढल्याने माणसाची स्मरणशक्ती अर्थात मेमरी निरूपयाेगी झाल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स........

असे का हाेते?

-दैनंदिन जीवनात गणिताला खूप महत्त्व आहे. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा दरराेज वापर हाेताे. स्मार्टफाेन येण्यापूर्वी अनेकजण क्षणात गणिताची आकडेमाेड करीत हाेते. शिवाय पाढेसुद्धा ताेंडपाठ हाेते. मात्र, आता माेठ्या माणसांनासुद्धा दाेन ते तीन आकडे पाढे येत नसल्याचे दिसून येते.

-बुद्धीला व मेंदूला सध्या ताण दिला जात नसून, माणूस तयार गाेष्टी स्वीकारण्याकडे प्रचंड वळला आहे. परिणामी माणसाची स्मरणशक्ती कमी झाली आहे. स्मार्टफाेनचा विचारशक्तीवर माेठा परिणाम झाल्याने आबालवुद्धांसह साऱ्यांचे विस्मरण प्रचंड वाढले आहे.

-दहा वर्षांपूर्वी ग्रामीण व शहरी भागातील बरेच नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या बऱ्याच गाेष्टी डायरीत नाेंद करून ठेवत हाेते. शिवाय व्यवहारातील हिशेब डाेक्यातही कायम करून ठेवत हाेते. मात्र, आता या प्रकाराला ब्रेक लागला आहे.

बाॅक्स ....

हे टाळण्यासाठी....

- माेबाईलचा अतिवापर टाळावा तसेच ध्यान, व्यायाम, प्राणायाम करणे सुरू करावे, परिवारातील सदस्यांसाेबत तसेच मित्र, मैत्रिणींसाेबत निवांत गप्पा माराव्या. संगीतसुद्धा ऐकावे.

- स्मरणशक्ती अर्थात मेमरी मजबूत राहण्यासाठी विविध पुस्तकांचे वाचन शिवाय लेखन, स्मरण, चिंतन, मनन करणे गरजेचे आहे.

- बुद्धिमत्तेला चालना देणारी विविध प्रकारची गणितीय आकडेमाेड करावी. अनेक बाबींचा तुलनात्मक अभ्यास करावा.

काेट ....

माेबाईलचा सर्वाधिक वापर चॅटिंगसाठी हाेताना दिसत आहे. अशीच स्थिती १५ ते २० वर्षांपर्यंत कायम राहिली तर त्याचा विचार क्षमतेवर माेठा परिणाम हाेईल. परिणामी सुखी आयुष्यात अडचणी निर्माण हाेतील. त्यासाठी चांगल्या सवयी स्वीकारून माेबाईलचा वापर आलेले काॅल घेणे व इतरांना फोन करण्यापुरताच करावा.

- मानसाेपचार तज्ज्ञ

बाॅक्स ......

मुलांना, आजाेबाला नंबर्स पाठ, कारण.....

आजाेबा

पाच ते दहा हजारांपर्यंतच्या व्यवहारातील दैनंदिन हिशेब क्षणात करता येतात शिवाय माेबाईलमधील फाेन नंबर व पाढे आजाेबाला पाठ आहेत.

बाॅक्स .....

बाबा/आई

साधा माेबाईल व स्मार्टफाेनचा वापर नेहमी केला जात असल्याने माेबाईल नंबर पाठ राहत नाही. लहानशा हिशेबासाठी माेबाईलचा आधार घ्यावा लागताे.

बाॅक्स .....

लहान मुलगा

शाळेत जात असलेल्या पहिली ते चाैथीपर्यंतच्या लहान मुलांना विविध पाढे पाठ आहेत. शिवाय कविता, गाणी ताेंडपाठ आहेत. बेरीज, वजाबाकी सहज करता येते.

Web Title: Mobile has run out of memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.