चातगावातील मोबाईलधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:33 AM2021-01-21T04:33:07+5:302021-01-21T04:33:07+5:30

धोडराज मार्गावर खड्डे भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात ...

Mobile holders in Chatgaon suffer | चातगावातील मोबाईलधारक त्रस्त

चातगावातील मोबाईलधारक त्रस्त

Next

धोडराज मार्गावर खड्डे

भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. धोडराजवासिय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागील वर्षी या मार्गाच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे.

गॅस रिफिलिंग व्यवस्थेत सुधारणा करा

देसाईगंज : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, गॅस रिफिलिंगची व्यवस्था मोठ्या गावात दूर अंतरावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

शबरी घरकुल मिळेना

गडचिरोली : आदिवासी नागरिकांसाठी शबरी घरकुल योजना आहे. या योजनेंतर्गत गरजू व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. मात्र, आदिवासी भागातील अनेक नागरिक सदर योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, गरजू लाभार्थ्यांना वगळण्याचे प्रकार स्थानिक स्तरावर घडतात.

कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या

गडचिरोली : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

रांगी मार्गालगत झुडपे

वैरागड : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वनविभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे.

मालेवाडा भागात समस्या

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्यसेवा आहे. आरोग्यसेवा सुधारण्याची मागणी आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.

भाकरोंडीत रस्ते खड्डेमय

भाकरोंडी : परिसरातील अनेक गावांतील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सदर मार्गाची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आवागमन करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे.

लघु सिंचन इमारत जीर्ण

अहेरी : उपविभागातील सहा तालुक्यांचा कारभार पाहणारे अहेरी येथील उपविभागीय लघु सिंचन जलसंधारण कार्यालयाला शासनाने इमारत बांधून दिली नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. याशिवाय अनेक कार्यालये दुसऱ्या इमारतींमधून चालविले जात आहेत.

Web Title: Mobile holders in Chatgaon suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.