आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘मानव विकास’मधून मोहफूल प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:43+5:302021-05-30T04:28:43+5:30

मोहफुलाचे झाड हे आदिवासी बांधवांसाठी कल्पवृक्ष आहे. मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहफूल ...

Mohful project from 'Manav Vikas' to uplift the living standards of the tribals | आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘मानव विकास’मधून मोहफूल प्रकल्प

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘मानव विकास’मधून मोहफूल प्रकल्प

Next

मोहफुलाचे झाड हे आदिवासी बांधवांसाठी कल्पवृक्ष आहे. मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी संस्थांचा व त्या भागाचाही विकास होईल, तसेच आदिवासी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास ना. पाडवी यांनी व्यक्त केला.

(बॉक्स)

निधीत ९० टक्के हिस्सा शासनाचा

या प्रकल्पासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याच्या ९० टक्के, म्हणजे ३ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात १० टक्के हिस्सा लाभार्थी किंवा आदिवासी समाज किंवा संस्था यांचा राहणार आहे. हा प्रकल्प राबविण्यापूर्वी त्याचे आधारभूत सर्वेक्षण करण्यात येणार असून, प्रकल्प संपल्यानंतर त्याच्या फलनिष्पत्तीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

(बॉक्स)

...अशी आहे योजना

या योजनेत जिल्ह्यातील १५ वनधन केंद्र/ग्राम संघांना मोहफूल खरेदी करून सामूहिक विक्री करण्यासाठी प्रतिकेंद्र १० लाख रुपयांचे खेळते भांडवल देण्यात येणार आहे. वनधन केंद्रातील आदिवासी कुटुंबाला मोहफूल संकलनासाठी लागणारे जाळी, ताडपत्री, प्लास्टिक कॅरेट हे साहित्य खरेदीसाठी ३०० आदिवासी कुटुंबाला प्रतिकुटुंब २ हजार रुपये याप्रमाणे निधी देण्यात येणार आहे, तसेच ग्रामीण भागातून मोहफूल खरेदी करून त्याची वाहतूक करणे व शीतगृहात साठवणूक करण्यासाठी वनधन केंद्र/ ग्राम संघातील सदस्यांना डीबीटीद्वारे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. याबरोबरच मोहआधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री खरेदीसाठी प्रत्येक वनधन केंद्रांना ५ लाख रुपये इतका निधी मिळणार आहे.

(बॉक्स)

५ हजार महिलांना प्रशिक्षण

गर्भवती आणि स्तनदा मातांना मोह हे उत्कृष्ट पोषण स्रोत आहे. यातून त्यांना चांगला पोषक आहार मिळतो. मोहापासून अनेक घरगुती वापरासाठीची उत्पादने तयार करता येतात. ही उत्पादने तयार करण्यासाठी ५ हजार महिलांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Mohful project from 'Manav Vikas' to uplift the living standards of the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.