मोकाट जनावरांचे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:35 AM2021-08-29T04:35:15+5:302021-08-29T04:35:15+5:30

२५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील कॉम्प्लेक्स येथील शासकीय रुग्णालयासमोर एका अज्ञात वाहनाने वासराला धडक दिली. ...

Mokat animal accidents increased | मोकाट जनावरांचे अपघात वाढले

मोकाट जनावरांचे अपघात वाढले

Next

२५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील कॉम्प्लेक्स येथील शासकीय रुग्णालयासमोर एका अज्ञात वाहनाने वासराला धडक दिली. यामध्ये वासरू गंभीर जखमी झाले. ही बाब काही नागरिकांनी पीपल फाॅर एनव्हायरमेंट ॲन्ड ॲनिमल वेल्फेअर संस्थेचे सचिव अजय कुकडकर यांना दिली. वासराला नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन डेपोकडे नेण्यात येत होते. दरम्यान, त्याच मार्गावरील आयटीआय चौकात आणखी एक बैल अपघातात जखमी होऊन पडल्याचे निदर्शनास आले. त्या बैलालासुद्धा वाहनात टाकून कचरा व्यवस्थापन डेपोमध्ये नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरामे यांना बोलाविण्यात आले. दोन्ही जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले परंतु वासरू गंभीर जखमी असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर बैलाचे प्राण वाचविण्यात यश आले. यावेळी गिरीश कोहपरे, चेतन शेंडे, दीपक राठी, सौरभ सातपुते, अमित तिवाडे, नयन कहाले, मुरारी तिवारी यांनी मदत केली.

Web Title: Mokat animal accidents increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.