संगणक परिचालकांचे मानधन थकले

By admin | Published: May 29, 2014 02:17 AM2014-05-29T02:17:02+5:302014-05-29T02:17:02+5:30

ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्रात काम करणार्‍या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन थकले ...

Money laundering of computer operators is tired | संगणक परिचालकांचे मानधन थकले

संगणक परिचालकांचे मानधन थकले

Next

 

गडचिरोली : ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्रात काम करणार्‍या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन थकले असून मे महिन्याचेही मानधन रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये महाऑनलाईन कंपनी विषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे.

भारतातील सुमारे ७0 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मागील काही वर्षापासून ग्रामविकासाकडे विशेष लक्ष घातले आहे. नागरिकांचा योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्यास योजना यशस्वी होतात. ही बाब लक्षात घेऊन गावामध्ये ग्रामसभा स्थापन केली आहे. त्याचबरोबर भविष्यात केंद्र व राज्य शासनाचे अनुदान सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे धोरण आखले जात असल्याने देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे संगणकीकरण केले जात आहे. भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल ई- गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली. ग्रामपंचायतीच्या कामाध्ये सुसुत्रता व पारदर्शकपणा आणणे हा या मागील उद्देश आहे. ग्रामपंचायतीचे सर्व दस्तावेज संगणकीकरण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्राची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी संगणक परिचालकाची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत ४१४ संगणक परिचालक कार्यरत आहेत. या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन देण्यात आले नाही. याबद्दल संगणक परिचालक तालुका समन्वयकांना वेळोवेळी विचारत आहेत. तालुका समन्वयक मात्र आठ दिवसांनी मानधन मिळेल, असे सांगून वेळ मारून नेत आहेत. देशभरातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन करण्याच्या कामाला २00८ पासून सुरूवात झाली. ३ वर्षाचा कालावधी लोटूनही सर्व दस्तावेज ऑनलाईन झाले नाही. किंवा काही दस्तावेजांचे संगणकीकरणही झाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायती ऑनलाईन करण्यात शासनाला अडचणी येत आहेत. सर्व दस्तावेजांचे संगणकीकरण करून ऑनलाईन करण्याविषयी अधिकार्‍यांवर दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे काही अधिकारी दस्तावेज पूर्ण झाल्याशिवाय मे महिन्याचेही मानधन मिळणार नाही, अशी धमकी संगणक परिचालकांना देत आहेत. पहिलेच दोन महिन्याचे मानधन रखडल्याने संगणक परिचालक आर्थिक अडचणीत सापडले असतांना मे महिन्याचेही मानधन रखडण्याची शक्यता असल्याने संगणक परिचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिचालकांची नियुक्ती करतेवेळी ८ हजार रूपये मानधन देण्याचे महाऑनलाईनने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ हजार ५00 रूपये मानधन दिले जात आहे. एवढय़ा कमी मानधनात महिन्याभराचा खर्च भागविणे अशक्य आहे. संगणक परिचालक काम करीत आहेत. तेही मानधन वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये महाऑनलाईनच्या कारभाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आठ दिवसामध्ये मानधन उपलब्ध करून न दिल्यास कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाऑनलाईन कंपनी यावर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Money laundering of computer operators is tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.