संगणक परिचालकांचे मानधन थकले

By admin | Published: November 11, 2014 10:40 PM2014-11-11T22:40:36+5:302014-11-11T22:40:36+5:30

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात संपूर्ण जिल्हाभरात संगणक परिचालकांचे ५८ पदे कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहेत. मात्र या संगणक परिचालकांचे

Money laundering of computer operators is tired | संगणक परिचालकांचे मानधन थकले

संगणक परिचालकांचे मानधन थकले

Next

गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात संपूर्ण जिल्हाभरात संगणक परिचालकांचे ५८ पदे कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहेत. मात्र या संगणक परिचालकांचे माहे एप्रिल ते आॅक्टोबरदरम्यानचे तब्बल सात महिन्यांच्या कालावधीचे मानधन थकले आहे. यामुळे या संगणक परिचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने १५ नोव्हेंबरपर्यंत मानधन न दिल्यास १६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा अखिल भारतीय एडीईओ संघटना जिल्हा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
ईगल सिक्युरिटी अ‍ॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस, मुंबई या संस्थेद्वारे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत संपूर्ण राज्यभरात अकाऊटंट कम डाडा एन्ट्री आॅपरेटरपदाच्या २ हजार २९८ जागा कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहे. यापैकी गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रूग्णालयात संगणक परिचालकांच्या ५८ जागा भरण्यात आले आहे. जिल्ह्यातील कार्यरत ५८ संगणक परिचालकांना १ एप्रिल २०१४ पासून मानधन देण्यात आले नाही.
मानधन तत्काळ अदा करण्यात यावे, या मागणीला घेऊन संगणक परिचालकांनी एनआरएचएमचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अनुपम महेश गवळी यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी संगणक चालकांचे समाधान केले नाही, असा आरोप संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या संगणक आॅपरेटरच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही संघटनेनी केला आहे.
प्रलंबित मानधन १५ नोव्हेंबरपर्यंत अदा करण्यात यावे, अन्यथा संघटनेच्यावतीने १६ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा आॅपरेटर संघटनेचे जिल्हा प्रमुख गणेश मानकर, मंगेश भोयर, पुनम सपाटे, ज्योती गेडाम, वर्षा रासेकर, कुमुद झुरे, वैशाली चन्नावार, कविता झलके, सचिन कोटरंगे, महेश कावरे, राजेश ऐत्तावार, आश्विन रंगारी, अमित भसारकर, प्रदीप सोपनकर आदी संगणक परिचालकांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Money laundering of computer operators is tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.