येर्रागड्डा येथे उभारले स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:32 AM2018-08-01T01:32:00+5:302018-08-01T01:32:46+5:30

जिमलगट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या येर्रागड्डा येथील रामदास बंडे गावडे यांची २२ आॅक्टोबर २०११ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. गावातील नागरिकांनी रामदासचे स्मारक उभारून नक्षलवाद्यांच्या हिंसक कृतीचा निषेध केला.

 Monument built at Yerragadda | येर्रागड्डा येथे उभारले स्मारक

येर्रागड्डा येथे उभारले स्मारक

googlenewsNext
ठळक मुद्देनक्षलवादाचा धिक्कार : जिमलगट्टा परिसरात नक्षलविरोधी बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : जिमलगट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या येर्रागड्डा येथील रामदास बंडे गावडे यांची २२ आॅक्टोबर २०११ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. गावातील नागरिकांनी रामदासचे स्मारक उभारून नक्षलवाद्यांच्या हिंसक कृतीचा निषेध केला.
गावातील नागरिकांनी स्वत: पुढाकार घेत २८ जुलै रोजी रामदास गावडे यांचे स्मारक बांधले. ते गावचे पोलीस पाटील होते. जिमलगट्टा गावात तसेच आजुबाजूच्या परिसरात नक्षलविरोधी बॅनर लावण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांकडून महिलांवर होणाºया अत्याचाराचा निषेध या बॅनरमध्ये केला आहे. पूल, रस्ते बांधकामास नक्षलवाद्यांनी विरोध केल्याने दुर्गम भागातील नागरिक प्रगतीपासून वंचित राहिले आहेत, असे परिसरात लावलेल्या नक्षलविरोधी बॅनवर लिहिले आहे.
 

Web Title:  Monument built at Yerragadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.