देसाईगंजच्या निर्मात्याचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:35 AM2021-04-25T04:35:53+5:302021-04-25T04:35:53+5:30

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास ...

The monument of the creator of Desaiganj in the grip of encroachment | देसाईगंजच्या निर्मात्याचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात

देसाईगंजच्या निर्मात्याचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात

googlenewsNext

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास जरी ‘वडसा’ असे म्हटले जात असले तरी ते केवळ रेल्वेस्थानकाचे नाव आहे. शहर आणि नगरपरिषदेचे अधिकृत नाव मात्र ‘देसाईगंज’ असे आहे. मूळचे वडसा गाव अजूनही जवळच जुनी वडसा या नावाने टिकून आहे. दुष्काळी आणि पूरग्रस्त खेड्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी वडसा गाव आणि रेल्वेस्थानक यामधील उपलब्ध जागेवर एक लहान वसाहत उभारली. ब्रिटिश सरकारने त्या वसाहतीला त्यांचेच नाव दिले. देसाई यांचे पूर्ण नाव चंदुलाल चुनीलाल देसाई होते. राजदूत असताना फाळणीनंतरही अडकून पडलेल्या ५० हजारांहून अधिक हिंदूना भारतात आणून देसाई यांनी पुनर्वसित केले. स्वातंत्र्यानंतर वडसाजवळील देसाईगंज वसाहत हळूहळू वाढू लागली. १९५८ला तिथे वीज नसतानासुद्धा ७ राईस मिल होत्या. पुढे १९६०च्या २६ जानेवारीला तिथे वीज पाेहाेचली. १९६१ ला देसाईगंज वसाहत, जुनी वडसा आणि बाजूचे नैनपूर हे खेडे जोडून नगरपरिषद घोषित करण्यात आली. आजच्याप्रमाणे तेव्हाही काही लोक याविरोधात कोर्टात गेले होते. पण, शेवटी ग्यानचंद दुनिचंद हे देसाईगंजचे पहिले नगराध्यक्ष झाले. १९५१मध्ये देसाईगंजची लाेकसंख्या केवळ १ हजार ८०० हाेती आणि केवळ १० वर्षात १९६१ पर्यंत ११ हजार लोकवस्तीच्या शहरात नगर परिषद अस्तित्त्वात आली. गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर आरमोरी तालुक्यातील व जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद देसाईगंज येथे हाेती. त्यानंतर १९९२ला देसाईगंज तालुका घोषित झाला. देसाईगंज शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सी. सी. देसाई यांचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शहर निर्मितीच्या स्मृती विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पाेहाेचावा, यासाठी येथील अतिक्रमण हटवून सी. सी. देसाई यांच्या स्मृतिस्तंभाचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे.

बाॅक्स

काेण हाेते सी. सी. देसाई?

देसाईगंज हे नाव देणारे सी. सी. देसाई कोण हे दुर्दैवाने आज स्थानिक लोकांनासुद्धा माहीत नाही. कुणी ते मालगुजार, जुने राजकारणी नेते होते असे सांगतात. केवळ ८० ते ९० वर्षांपूर्वी नावारुपाला आलेल्या देसाईगंज शहराच्या स्थापनेचा काळ हा विस्मृतीत गेलेला आहे. १९३३ यावर्षी तत्कालीन चांदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सी. सी.देसाई यांची नेमणूक झाली. देसाई हे अभ्यासू आणि कार्यक्षम जिल्हाधिकारी होते. गुजरातच्या भद्रण या गावी २७ एप्रिल १९०० राेजी जन्मलेले देसाई १९२३ मध्ये इंग्लंडमध्ये आय. सी. एस. झाले. १९३० आणि १९४०च्या दशकात मध्य प्रांतात विविध पदांवर कार्यरत देसाई पदोन्नतीने पुढे मध्य प्रांताचे मुख्य सचिव झाले. अतिशय प्रतिष्ठित अशा या प्रशासकाची पुढे १९५४ - ५७ दरम्यान भारताचे राजदूत म्हणून श्रीलंका आणि पाकिस्तान येथे रवानगी झाली.

===Photopath===

230421\271523gad_6_23042021_30.jpg

===Caption===

अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले सी.सी देसाई यांचे स्मृतिस्तंभ.

Web Title: The monument of the creator of Desaiganj in the grip of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.