काेराेनात ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:54+5:302020-12-30T04:44:54+5:30

बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयराेगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती काेराेनापासून सहज मुक्त हाेत हाेते. मात्र वयाेवृध्द नागरिक ...

More than 50% of patients in Kerala die due to high blood pressure | काेराेनात ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबामुळे

काेराेनात ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबामुळे

googlenewsNext

बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयराेगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती काेराेनापासून सहज मुक्त हाेत हाेते. मात्र वयाेवृध्द नागरिक तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयराेग व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र काेराेनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर हाेत हाेती. तालुकास्तरावर असलेल्या बहुतांश रूग्णांना जिल्हास्थळी हलवावे लागत हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती हाेत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू हाेत हाेता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ काेराेना रूग्णांचा मृत्यू झाला. आराेग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त हाेते. सुरूवातीच्या कालावधीत काेराेनाची भयंकर भिती हाेती. त्यामुळे उच्च रक्तदाबग्रस्त रूग्णाला काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याचा रक्तदाब आणखी वाढत हाेता. तसेच मधुमेहग्रस्तही काेराेनाचे बळी पडले आहेत.

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वयाचे विश्लेषण केल्यास बहुतांश व्यक्ती ६० वर्षांच्या पुढील वयाचे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गडचिराेली जिल्ह्यात जे एकूण मृत्यू झाले, त्यामध्ये २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. सर्वाधिक कमी वयाचा रूग्ण २२ वर्षांचा असून ताे देसाईगंज येथील आहे. वाढत्या वयाबराेबरच अनेक आजार वाढतात. तसेच वयाेवृध्द नागरिकाची राेगप्रतिकारक क्षमता कमी हाेत असल्याने काेराेनापासून धाेका हाेत हाेता. त्यामुळेच वयावृध्द नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. तसेच अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्ला आराेग्य विभागामार्फत दिला जात हाेता.

बाॅक्स

मधुमेह आहे, काळजी घ्या !

उच्च रक्तदाबाबराेबरच मधुमेह असलेल्या रूग्णांना काेराेनापासून धाेका आहे. मधुमेहग्रस्त रूग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याची प्रकृती गंभीर हाेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त नागरिकांनी काेराेना हाेणार नाही,यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ज्या रूग्णांना मधुमेह आहे अशांनी तत्काळ रूग्णालयात भरती हाेण्याची गरज आहे. मधुमेहग्रस्त रूग्णावर वेळीच उपचार झाल्यास काेराेनापासून मुक्ती मिळण्यास मदत हाेईल. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून खबरदारी घेण्याची गरज आहे.

राेग लपविल्याने अनेकांचा गेला जीव

काेराेनाची लागण हाेऊनही काही रूग्ण खासगी रूग्णालयातच इतर उपचार करीत हाेते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात ते भरती हाेत हाेते. त्यामुळे नागरिकांनी याेग्य काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: More than 50% of patients in Kerala die due to high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.