टीईटी उत्तीर्ण नसलेल्या ५०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:24 AM2021-06-30T04:24:06+5:302021-06-30T04:24:06+5:30

टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांना सेवेत कायम ठेवण्याबाबतच्या याचिका औरंगाबाद खंडपीठात करण्यात आल्या आहेत. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने या ...

More than 500 teachers who did not pass the TET were fired | टीईटी उत्तीर्ण नसलेल्या ५०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात

टीईटी उत्तीर्ण नसलेल्या ५०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात

Next

टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांना सेवेत कायम ठेवण्याबाबतच्या याचिका औरंगाबाद खंडपीठात करण्यात आल्या आहेत. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने या शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात आल्या आहेत.

बाॅक्स .......

जिल्हा परिषदेचे शिक्षक भाग्यशाली

जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची नियुक्ती २०१३ पूर्वीची आहे. २०१९ मध्ये जवळपास ५० शिक्षकांची भरती करण्यात आली हाेती. हे सर्वच शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना या निकालाने काहीच फरक पडला नाही.

बाॅक्स .....

आयुष्याच्या शेवटी नाेकरी मिळाली, तीही जाण्याचा धाेका

काही शिक्षक २०१३ पूर्वीच शाळांमध्ये शिकवायला लागले. मात्र त्यांच्या पदाला मान्यता २०१३ नंतर घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षक टीईटीच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. या शाळांमध्ये कार्यरत असलेले काही शिक्षक ४५ ते ५० वर्षांचे आहेत. नाेकरीच्या शेवटच्या टप्प्यात वेतन सुरू झाले; मात्र टीईटी नसल्याने आता नाेकरी जाण्याचा धाेका आहे.

बाॅक्स ......

शिक्षणाधिकारी म्हणतात, चारच शिक्षक

गडचिराेली जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण नसलेले केवळ चारच शिक्षक आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी दिली आहे. मात्र ‘लाेकमत’ने काही अंशत: विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना फाेन करून विचारले असता, टीईटी उत्तीर्ण नसलेले जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक शिक्षक असल्याची शक्यता वर्तविली आहे.

बाॅक्स ....

इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही टीईटी उत्तीर्ण शिक्षक सक्तीचे करा

खासगी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून परवानगी घेतात. त्यामुळे या शाळांना शासनाचे सर्वच नियम पाळणे आवश्यक आहे. राज्य बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमधील शिक्षक टीईटी असणे आवश्यक आहे. तसेच सीबीएससी बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नसल्याने या शाळांमधील ९९ टक्के शिक्षक टीईटी व सीईटी उत्तीर्ण झाले नसल्याचे दिसून येतात. या शाळांनाही टीईटी व सीटीईटी उत्तीर्ण असलेले शिक्षक नेमण्याची सक्ती करण्याची गरज आहे.

बाॅक्स ..

टीईटी उत्तीर्ण नसलेले एकूण शिक्षक

५००

अनुदानित शाळांमधील शिक्षक

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक

४०

इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शिक्षक

४५०

जिल्ह्यातील एकूण शिक्षक

७५००

अनुदानित शाळांमधील शिक्षक

२०००

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक

१०००

जिल्हा परिषदेचे शिक्षक

४५००

Web Title: More than 500 teachers who did not pass the TET were fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.