थायरॉइड वाढतोय; २५ हजारांवर रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:46 PM2024-05-02T15:46:48+5:302024-05-02T15:50:43+5:30

Gadchiroli : सकस आहाराची कमतरता, धावपळीची जीवनशैली कारणीभूत

More than 25 thousand patients of Thyroid | थायरॉइड वाढतोय; २५ हजारांवर रुग्ण

Thyroid cases are rapidly increasing

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
सकस आहाराची कमतरता आणि धावपळीची जीवनशैली यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे, महिलांमध्ये थायरॉइड आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाद्वारे करण्यात आलेल्या तपासणीअंतर्गत जिल्ह्यात जवळपास २५ हजारांवर महिलांना थायरॉइड असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत व उपचारात निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागामार्फत रुग्णालयात निःशुल्क उपचार करून दिले जात आहेत.

थायरॉइड हा आजार वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळून येतो. मात्र, अलीकडे सकस आहाराची कमतरता, तसेच बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातसुद्धा, तसेच मुलींमध्येदेखील हा आजार आढळून येत आहे. हार्मोन्समध्ये बदल व धावपळीचे जीवन यामुळे मुलींनाही थायरॉइड आजाराचा धोका बळावला आहे. शहरी भागातील शाळकरी किशोरवयीन मुलींमध्ये थायरॉइडचे प्रमाण दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक दक्षता बाळगत आहे. थायरॉइडग्रस्त रुग्णांना आता सर्व शासकीय रुग्णालयात मोफत परिपूर्ण औषधोपचार पुरविला जात आहे. पहिल्या टप्प्यात तपासणी, मोफत औषधोपचार तसेच रक्त चाचणी व त्यानंतरच्या विविध चाचण्या मोफत केल्या जातात. त्यामुळे निदान करण्यासाठी रुग्णांना अधिक खर्च येत नाही.

काय आहेत लक्षणे?
सामान्यतः थॉयराइडची काही प्रमुख लक्षणे आहेत. यामध्ये वजन वाढणे, चेहरा व पायांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, पाळीमध्ये बदल होणे (महिलांसाठी), केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे आदींचा समावेश आहे. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: More than 25 thousand patients of Thyroid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.