मार्र्कं डा जत्रेसाठी सव्वा लाखांचा अतिरिक्त निधी
By admin | Published: February 10, 2016 01:51 AM2016-02-10T01:51:34+5:302016-02-10T01:51:34+5:30
जत्रेसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी मार्र्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे केली होती.
ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक : भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यास होणार मदत
चामोर्शी : जत्रेसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी मार्र्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने अतिरिक्त १ लाख १६ हजार रूपयांचा निधी मंजूर केला असून सदर निधी ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यास मदत होणार आहे.
मार्र्कं डादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्चपासून जत्रा भरणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान अतुल गण्यारपवार यांनी ग्रामपंचायतला प्राप्त झालेल्या सार्वजनिक शौचालय निधीमधून यात्रेदरम्यान मोबाईल शौचालय उपलब्ध करून द्यावे, १ किमीच्या परिसरातील नदी काठाची स्वच्छता व नदीच्या पाण्यातील चिला काढून साफसफाई करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सर्व विभागाच्या कामांचा आढावा यादरम्यान घेण्यात आला. प्रत्येक विभागाने यात्रेपूर्वी कामे पूर्ण करावी, असे निर्देश बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले.
काही विभागांचे नियोजनानुसार काम पूर्णत्वास आले आहे. मात्र काही विभागांनी अजूनपर्यंत कामास सुरुवात केली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने त्यानुसार नियोजन केले आहे. पोलीस विभाग, एसटी विभागानेही आपापल्यापरीने नियोजन केले असून त्याची तयारी सुरू केली आहे.
आढावा बैठकीला मार्र्कं डादेवच्या सरपंच ललीता मरस्कोल्हे, मार्र्कं डेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, तहसीलदार यू. जी. वैद्य, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालीक धनकर, मुख्य लेखाधिकारी दामोधर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी, कार्यकारी अभियंता के. आर. घोडमारे, उपविभागीय अभियंता बी. जी. वझरकर, पोलीस उपनिरीक्षक खंडारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमित माणुसमारे, गंगाधर कोंडुकवार, पोलीस पाटील भारती आभारे, राजू शेंडे, मंडळ अधिकारी पी. एस. बोदलकर, तलाठी भरडकर, विस्तार अधिकारी डी. पी. भोगे, सचिव दिनेश सराटे, उपसरपंच सेविकांत आभारे, अभियंता मनोज रणदिवे, रोशन खोकले यासह विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)