बाजार समितीत तारण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:59 AM2017-12-15T00:59:14+5:302017-12-15T01:00:26+5:30

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ १० डिसेंबर रोजी कृउबासचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Mortgage Plan in Market Committee | बाजार समितीत तारण योजना

बाजार समितीत तारण योजना

Next
ठळक मुद्देचामोर्शी तालुक्यात गोदाम : ठेवलेल्या मालावर ७५ टक्के मिळणार कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ १० डिसेंबर रोजी कृउबासचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आला.
तारण योजनेत एका शेतकºयाचा ५० क्विंटल शेतमाल ठेवला जाणार आहे. माल ठेवताना चालू हंगामाचा सातबारा, आधारकार्ड व बँकेच्या पासबूकची प्रत आवश्यक आहे. तारण योजनेकरिता चामोर्शी येथील १ हजार २५० मेट्रिक टन क्षमतेचे एक गोदाम व चित्तरंजनपूर येथील एक हजार मेट्रिक क्षमतेचे एक गोदाम आरक्षित ठेवण्यात आले आहे. शेतकºयांनी आपला माल तारणमध्ये ठेवल्यास आधारभूत भावाच्या हिशोबाने ७५ टक्के रक्कम कर्ज सहा महिण्यांकरिता सहा टक्के व्याजाने उपलब्ध करून देण्यात येईल. तारणात ठेवलेल्या मालाचा बाजार समिती सहा महिन्यात लिलाव करून विक्री करेल. घेतलेले कर्ज, व्याज, गोदामभाडे, हमाली खर्च कपात करून उर्वरित रक्कम सदर शेतकºयास अदा करेल. शेतकºयांसाठी सदर योजना अत्यंत लाभदायक असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिली.
शेतमाल तारण योजनेच्या शुभारंभाप्रसंगी उपसभापती पे्रमानंद मल्लिक, सदस्य विनायकराव आभारे, शामराव लठारे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास चुधरी, बाजार समितीचे सहाय्यक सचिव एन. राजकोंडावार, लेखापाल सुरेश किरंगे, अमोल चिचघरे, भवेश किरंगे, रमेश खोबे्र, राकेश मुरकुटे, पुच्छलवार उपस्थित होते.

Web Title: Mortgage Plan in Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.