लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी

By संजय तिपाले | Published: September 25, 2023 05:59 PM2023-09-25T17:59:35+5:302023-09-25T18:01:04+5:30

चामोर्शी येथे दुचाकीला चिरडले: अपघातानंतर चालकाचा पोबारा

Mother-in-law along with mother and son were killed by a truck transporting iron ore, one injured | लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी

googlenewsNext

गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने तहसील कार्यालयासमोरील वळणावर दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांत आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे. प्रियंका गणेश जनध्यालवार (२४) , रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत.

नरेंद्र  नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत. मार्कंडादेव (ता.चामोर्शी) येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) गावी जाण्यासाठी निघाले. याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सीजी ०८ एयू- ९०४५) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. दुचाकी समोरील चाकाखाली सापडल्यानंतर १० तेे १५ फूट फरफटत गेली. रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

२० दिवसांत कुटुंबावर दुसरा आघात

अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या रुद्र याचे वडील गणेश जनध्यालवार यांचा २० दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्या. या दु:खातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जनध्यालवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.

रोष अन् संताप...

दरम्यान, अपघातानंतर चालकाने वाहन तेथेच सोडून पोबारा केला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकमध्ये फसलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी सूरजागड लोह खनिज वाहतुकीविरुध्द तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पो.नि.विजयानंद पाटील यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ट्रकखालून काढून रुग्णालयात पाठवले.

Web Title: Mother-in-law along with mother and son were killed by a truck transporting iron ore, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.