आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:26 AM2021-07-18T04:26:20+5:302021-07-18T04:26:20+5:30
गडचिराेली : २०२१-२२ या नवीन शैक्षणिक सत्रात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू झाले. वर्षभरानंतर शाळा ...
गडचिराेली : २०२१-२२ या नवीन शैक्षणिक सत्रात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू झाले. वर्षभरानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची हाैस असली तरी काेराेनाचे संकट असल्याने आई काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवत आहे. प्रत्यक्ष वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात अध्ययन हाेत असले तरी काेराेनापासून खबरदारी घ्यावी लागत आहे.
जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. ज्या गावांमध्ये महिनाभरापूर्वी काेराेनाचे रुग्ण आढळून आले अशा गावातील शाळा तूर्तास बंदच ठेवण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळा सुरू झाल्याने यंदाच्या सत्रात अद्यापही सुरू न झालेला विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम किती प्रमाणात पूर्ण हाेईल, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
काेट .....
गेल्या दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. उन्हाळ्यात काेराेनाचा उद्रेक झाला हाेता. त्यामुळे जिल्ह्यात अनेक जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी प्रमाणात असला तरी तिसऱ्या लाटेचा धाेका कायम आहे. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविताना मनात धास्ती आहे. माझा मुलगा इयत्ता आठवीत व मुलगी इयत्ता दहावीत आहे. त्यांना वर्गखाेल्यांमध्ये खबरदारी घेण्यास बजावले आहे.
- सुनीता काळबांधे, महिला पालक
काेट .....
नवीन शैक्षणिक सत्र सुरू हाेऊन जवळपास २० दिवसांचा कालावधी उलटला. प्रत्यक्षात मात्र १५ जुलैपासून वर्ग सुरू झाले. माझा मुलगा इयत्ता बारावीत आहे तर मुलगी इयत्ता नववीमध्ये आहे. काही दिवस मी त्यांचा अभ्यास घेतला. त्यांनाही स्वत: अभ्यास करण्यास सांगितले. परंतु आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, अशी अपेक्षा आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना याेग्य अध्यापन करावे.
- जास्वंदा भुरसे, महिला पालक
बाॅक्स ....
शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघाेळही करा!
काेराेनाची संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता आराेग्यतज्ज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेचा सर्वाधिक धाेका लहान मुलांना आहे, असेही म्हटले जात आहे. सध्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू असल्याने किशाेरवयीन मुलांनाही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शाळेतून घरी परतल्यानंतर कपडे बदलावे तसेच आंघाेळही करणे आवश्यक आहे. तेव्हाच काेराेनाचा संसर्ग पसरणार नाही. शाळांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाल्यास पुन्हा शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता पालक व्यक्त करीत आहेत.
बाॅक्स .....
अ) मास्क काढू नये.
ब) वारंवार हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावे.
क) फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघोळ करावी. दरराेज हाच क्रम ठेवावा.