समाज जीवनावर मोटवानी यांच्या कार्याचा ठसा
By admin | Published: July 4, 2016 01:07 AM2016-07-04T01:07:12+5:302016-07-04T01:07:12+5:30
व्यावसायिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जीवनात वावरणारे देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी आपल्या कार्याचा ठसा समाज जीवनावर उमटविला आहे,....
विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन : जेसा मोटवानी यांच्यासह अनेकांचा सत्कार
देसाईगंज : व्यावसायिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जीवनात वावरणारे देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी आपल्या कार्याचा ठसा समाज जीवनावर उमटविला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
देसाईगंज येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात आमदार वडेट्टीवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील, सिंधी समाजाचे धर्मगुरू दिलीप जग्यासी, अॅड. संजय गुरू, योगराज कुथे, परसराम टिकले, दिनेश कुर्झेकर, धनराज मुंडले, छोटे मस्जिद शोला, डॉ. पाटील, विक्की टुटेजा, हरिदास मोटवानी, राजू रासेकर, राजू आकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वडसा व गडचिरोली परिसरात शाळा, कॉलेज सुरू करून जेसा मोटवानी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देसाईगंज येथील १० वर्षीय राजेश पतरंगे या आंतरराष्ट्रीय कराटेपटूचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक तसेच डॉ. पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. देसाईगंज शहरातील लोकमत सखी मंचच्या सदस्यांना याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या हस्ते भेट वस्तूंचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका कल्पना कापसे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन मेरी विल्सन, प्रास्ताविक व आभार नगरसेविका निलोफर शेख यांनी मानले. (वार्ताहर)