वीज मीटर उपलब्ध न केल्यास आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:35 AM2021-03-19T04:35:38+5:302021-03-19T04:35:38+5:30
नागरिकांनी घरगुती वापरासाठी तसेच कृषिपंपाकरिता वीज विभागाकडे दोन-तीन महिन्यांपासून अर्ज करून डिमांडची रक्कमसुद्धा भरली. कोरोना सदृश परिस्थितीत आर्थिक अडचण ...
नागरिकांनी घरगुती वापरासाठी तसेच कृषिपंपाकरिता वीज विभागाकडे दोन-तीन महिन्यांपासून अर्ज करून डिमांडची रक्कमसुद्धा भरली. कोरोना सदृश परिस्थितीत आर्थिक अडचण असूनसुद्धा नागरिकांनी आपल्या सोईकरिता महावितरण कंपनीच्या सूचनेनुसार डिमांड भरला. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज मीटरचा पुरवठा केला नाही. नागरिक दररोज कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. विद्युत विभागात नागरिकांकडून विचारणा केली असता चार-पाच महिन्यांपासून वरिष्ठ कार्यालयाकडून मीटरचा पुरवठा होत नाही, असे कमालीची उत्तरे मिळत आहेत. आरमोरी तालुक्याच्या बहुतांश भागात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना आजमितीस धान पिकाला पाण्याची गरज आहे. विहिरी, बोरवेल उपलब्ध असताना दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज जोडणी करून दिली नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे विद्युत विभाग व शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
नागरिकांना घरगुती वीज मीटरचा पुरवठा लवकर करण्यात यावा, तसेच शेतीतील कृषिपंपाकरिता वीज जोडणी करून लवकरात लवकर वीज मीटर द्यावे, अन्यथा जिल्हाभर विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा भारत बावनथडे यांनी दिला आहे.