महामारीत मुन्नाभाई एमबीबीएस डाॅक्टरांची चलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:27+5:302021-06-26T04:25:27+5:30
गडचिराेली : काेराेना महामारीच्या कालावधीत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक शहरात उपचारासाठी येत नव्हते. काेराेनाच्या भीतीने शहरातील खासगी दवाखाने ...
गडचिराेली : काेराेना महामारीच्या कालावधीत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक शहरात उपचारासाठी येत नव्हते. काेराेनाच्या भीतीने शहरातील खासगी दवाखाने सुद्धा बंद ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे या कालावधीत बाेगस डाॅक्टरांनी स्वत:चा व्यवसाय जाेमात केला. आराेग्य विभागाने वर्षभराच्या कालावधीत जवळपास दहा डाॅक्टरांवर कारवाई केली आहे.
गडचिराेली जिल्ह्यात खासगी दवाखान्यांची संख्या फार कमी आहे. तसेच खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करण्याऐवढी ऐपत येथील नागरिकांमध्ये नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्येच उपचार घेतले जातात. मात्र काेराेनाच्या कालावधीत ताप, सर्दी, खाेकला यासारखे रुग्ण प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात आल्यास त्यांची काेराेना चाचणी केली जात हाेती. ती पाॅझिटिव्ह आल्यास काेराेना रुग्णालयात भरती केले जात हाेते. त्यामुळे नागरिकांनी सरकारी दवाखान्याकडे पाठ फिरविली. शहरातही खासगी दवाखान्यात उपचारासाठी येत नव्हते. याचा गैरफायदा गावखेड्यात असलेल्या बाेगस डाॅक्टरांनी उचलला. या कालावधीत त्यांचा व्यवसाय फार तेजीत सुरू हाेता. या डाॅक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार आराेग्य विभागाला देण्यात आले आहेत. आराेग्य विभागाने वर्षभराच्या कालावधीत दहा डाॅक्टरांवर कारवाई केली आहे. मात्र हे डाॅक्टर पुन्हा दुसऱ्या परिसरात जाऊन डाॅक्टरकीचा व्यवसाय करतात.
बाॅक्स....
आराेग्य सहायक व सेविकांना राहते माहिती
वैद्यकीय क्षेत्राचा काेणतेही प्रमाणपत्र नसताना केवळ दुसऱ्या डाॅक्टरकडे काही दिवस मदतनीस म्हणून केल्यानंतर स्वत:चा डाॅक्टरकीचा व्यवसाय एखाद्या माेठ्या गावात सुरू करतात. जिल्ह्यातील प्रत्येक माेठ्या गावांमध्ये अशाप्रकारचे डाॅक्टर आढळून येतात. आराेग्य सहायक, आराेग्य सेविका या ग्रामीणस्तरावर काम करीत असल्याने त्यांना या बाेगस डाॅक्टरची माहिती राहते. मात्र ते स्वत:हून याबाबतची तक्रार आराेग्य विभागाकडे करीत नाही. एखाद्या नागरिकाने तक्रार केल्यानंतरच संबंधित डाॅक्टरची चाैकशी करून कारवाई केली जाते.
बाॅक्स....
काेराेना काळात तीन दवाखाने केले सील
काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून रितसर परवानगी घ्यावी लागत हाेती. मात्र देसाईगंजातील दाेन व अहेरीतील एका दवाखान्याच्या संचालकांनी परवानगी न घेताच काेराेना रुग्णांवर उपचार सुरू केले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या दवाखान्यांवर कारवाई करण्यात आली.
बाॅक्स...
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
काेणत्याही प्रकारचे अधिकृत प्रशिक्षण नसताना डाॅक्टरची व्यवसाय केला जाते. यामध्ये औषधी देण्यात थाेडाफार तरी फरक पडला तरी संबंधित रुग्णाचा जीव जाऊ शकते. मात्र हे डाॅक्टर घरापर्यंत येऊन उपचार करतात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या शिक्षणाबाबत फारशी माहिती राहत नाही. त्यामुळे या डाॅक्टरांवर विश्वास ठेेवून त्यांच्याकडून उपचार करून घेतात.
बाॅक्स...
जिल्ह्यातील एकूण बाेगस डाॅक्टरवर कारवाई-१०
काेराेना काळात दवाखान्यांवर झालेली कारवाई-३
बाॅक्स...
इंजेक्शनवर चालते व्यवसाय
शहरातील डाॅक्टर रुग्णाची तपासणी केल्यानंतर सहजासहजी इंजेक्शन देत नाही. त्याच्यासाठी गाेळ्या लिहून देतात. मात्र ग्रामीण भागातील बाेगस डाॅक्टर इंजेक्शन देतात. जेवढे जास्त इंजेक्शन तेवढे अधिकचे पैसे घेतले जातात. एवढेच नाही तर स्वत:कडील गाेळ्याही देतात. सलाइन सुद्धा लावून देतात.