चळवळ उभी करणारे साहित्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:14 AM2018-01-21T00:14:14+5:302018-01-21T00:14:29+5:30

समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे.

Movement needed for movement materials | चळवळ उभी करणारे साहित्य आवश्यक

चळवळ उभी करणारे साहित्य आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देवैशाली डोळस यांचे प्रतिपादन : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे. लढावू वृत्ती दाखविली पाहिजे, असे विचार साहित्यीक वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.
फुले आंबेडकर विचार मंच गडचिरोलीच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी वैशाली डोळस या संमेलनाध्यक्ष होत्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार जोगेंद्र कवाडे, व्ही. डी. मेश्राम, डॉ. सरोज कुथे, डॉ. विजय रामटेके, एमएसईबीचे अभियंता विजय मेश्राम, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, डॉ. चंद्रशेखर डोंगरवार, बाळकृष्ण बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, प्राचार्य राजकुमार शेंडे, डी. एम. चापले, वनिता बांबोळे, अरूण गजबे, मुनिश्वर बोरकर, गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून अ‍ॅड. राम मेश्राम होते.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, जे साहित्य सत्य लपविते. ते साहित्य नाकारले पाहिजे. मी सत्य स्वीकारणारा माणूस आहे. आपण आता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधील वाद संपवून विकासाच्या मार्गाने चालले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन करताना सळसळत्या रक्ताची माणसे पुढे आली पाहिजे. आमच्या वाटेला प्रतीगामी विचाराच्या लोकांनी जाऊ नये. तरूणांनी क्रांती केली पाहिजे, असे मार्गदर्शन केले. संचालन पद्मिनी धनविजय तर आभार वनिता बांबोळे यांनी मानले. यावेळी इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. रविवारी अनिरूध्द वनकर यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Web Title: Movement needed for movement materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.