महसूल कर्मचाºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:13 AM2017-10-11T00:13:23+5:302017-10-11T00:13:34+5:30

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे.

Movement of revenue workers | महसूल कर्मचाºयांचे आंदोलन

महसूल कर्मचाºयांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देप्रशासकीय कामकाज प्रभावित : आरमोरी व चामोर्शी, देसाईगंजसह जिल्हाभरात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. अव्वल कारकून अतिरिक्त होऊन त्यांना पदावन्नत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पदभरतीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाभरातील कर्मचाºयांनी १० आॅक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले.
आरमोरी - पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे पदोन्नतीचे असल्यामुळे सरळ सेवेने भरण्यात येऊ नये, नायब तहसीलदारांचा नवा ग्रेड पे मान्य करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका शाखा आरमोरीच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयस्थळी हजर झाले. मात्र त्यांनी कोणतेही प्रशासकीय दैनंदिन कामकाज केले नाही. या आंदोलनात आरमोरीचे नायब तहसीलदार पित्तुलवार, भुरसे, कुकडकर, शेषराव बागमरे, दिलीप जवंजाळकर, राऊत, ढेंगे, राजू धुडसे आदींसह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
चामोर्शी - महसूल कर्मचारी संघटना तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. महसूल कर्मचाºयांनी यावेळी शासन धोरणाविरोधात नारेबाजी केली. या आंदोलनात संघटनेचे तालुका सचिव एस. पी. शिंदे, उपाध्यक्ष एस. डी. बारसिंगे, नायब तहसीलदार एस. के. बावणे, एस. आर. तनगुलवार, जे. के. काझी, अव्वल कारकून के. पी. शेरकी, आर. एम. वैद्य, एस. आर. फुलझेले, एस. आर. बावणे, आर. एस. कुशमवार, डी. आर. पेशट्टीवार, ए. ए. गव्हारे, लिपीक, टंकलेखक, एम. पी. कुळमेथे, एस. ए. ठाकूर, एस. पी. शिंदे, डी.सी. सहारे, बी. ए. उध्दवार, आर. पी. कुळसंगे, एम. डब्ल्यू. मडावी, जे. एम. मडावी, जे. व्ही. कालेश्वरराव, डी. के. लिंगायत, कोडाप, शिपाई एफ. दर्राे, एस. एम. मडावी, पहारेकरी चांदेकर, शिपाई अंजना सोनकुसरे, लिपीक प्रवीण आदे, अमोल गेडाम आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, भामरागड, अहेरी, मुलचेरा, कोरची आदी तालुक्यातील पुरवठा विभाग व महसूल कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. दरम्यान शेकडो कर्मचाºयांनी कार्यालयाच्या परिसरात धरणे दिले. या आंदोलनामुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना आल्यापावली जावे लागले.

Web Title: Movement of revenue workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.