जारावंडीत रस्त्यासाठी गावकºयांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:02 AM2017-11-08T00:02:03+5:302017-11-08T00:02:24+5:30
एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जारावंडी येथील नागरिकांनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. त्याबरोबर व्यापाºयांनी बंद पाळून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जारावंडी येथील नागरिकांनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. त्याबरोबर व्यापाºयांनी बंद पाळून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.
जारावंडी ते एटापल्ली हा एटापल्ली तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा व मुख्य मार्ग आहे. याच मार्गाने या परिसरातील कर्मचारी ये-जा करतात. एटापल्ली हे तालुका स्थळ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही एटापल्ली येथे नेहमी ये-जा करावे लागते. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र या मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर डांबराचे निशानसुद्धा शिल्लक नाही. खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने एक खड्डा चुकविताच दुसरा खड्डा येतो. त्यामुळे सर्वच वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या मार्गाच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. मात्र या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर अनेक ठेंगणे पुल आहेत. ठेंगण्या पुलांवरून पावसाळ्यात पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूकच ठप्प पडते. या कालावधीत एखात्या गंभीर रूग्णाला दवाखाण्यात पोहोचविणेही शक्य होत नाही. परिणामी त्याला जीव गमवावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेवून या रस्त्याची दुरूस्ती व ठेंगण्या पुलांची दुरूस्ती करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके व पंचायत समिती सदस्य शालीकराम गेडाम यांच्या नेतृत्वात जारावंडी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. जारावंडी येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात धरणे आंदोलन व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जक्काजाम आंदोलनामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. मंगळवारी एटापल्ली येथील आठवडी बाजार होता. या आंदोलनामुळे व्यापाºयांना आठवडी बाजारात पोहोचता आले नाही. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एटापल्ली येथील व्यापाºयांनी दिवसभर बंद पाळला.
आंदोलनात सरपंच सुधाकर टेकाम, शामल मडावी, मंदा गेडाम, सुनंदा उईके, वर्षा उसेंडी, माजी सरपंच हरिदास टेकाम, मनोहर हिचामी, मोहन नामेवार, दिलीप दास, तुळशिदास मडावी, अंतराम नरोटे, घनश्याम नाईक, दुलाल कुंडू, युवक काँग्रेसचे अंकित वरगंटीवार, अरूण तेलकुंटलवार आदी उपस्थित होते.
जारावंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जाधव व सहाय्यक पोलीस निरिक्षक पेंढारकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदोलनकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले.