महिला रुग्णालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:35 PM2017-11-27T23:35:38+5:302017-11-27T23:36:26+5:30

येथील बहुप्रतिक्षित महिला आणि बाल रुग्णालय लवकरच सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.

The movement of women hospital started | महिला रुग्णालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग

महिला रुग्णालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग

googlenewsNext
ठळक मुद्देसहायक उपसंचालकांकडून पाहणी : आवश्यक मशिनरी लावणे सुरू

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : येथील बहुप्रतिक्षित महिला आणि बाल रुग्णालय लवकरच सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. यासाठी पदभरती झाली असून आवश्यक त्या मशिनरी बसविणे सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आरोग्य उपसंचालकांनीही पाहणी करून या कामाला वेग दिला आहे. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या रुग्णालयाचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इंदिरा गांधी चौकातजवळ या प्रस्तावित रुग्णालयाची भव्य इमारत बांधून तयार आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयासाठी शासनाने ९५ पदांची निर्मिती केली आहे. खासगी एजन्सीमार्फत काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.आर. एस. फारूकी यांनी गडचिरोलीत येऊन सदर महिला रुग्णालयाचे निरीक्षण करून ते सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रकिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नगर परिषदेला एक पत्र लिहून रुग्णालयाच्या बाहेरील भागात असलेले अतिक्रमण के आजू-बाजू का अतिक्रमण हटवून अग्निशमन यंत्र, परिसरात १२ पथदिवे, तसेच रुग्णसेवेसाठी नगर परिषदेकडून दिले जाणारे परवाने तत्काळ देण्यासाठी पत्र दिले. या रुग्णालयासाठी आवश्यक असणारी मशिनरी उपलब्ध केली असून डिसेंबरमध्ये हे रुग्णालय सुरू होऊ शकते, असे डॉ.फारूकी यांनी सांगितले.
१० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल काम
प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी बाळंतपण आणि शस्त्रक्रियेनंतरच्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत. हे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: The movement of women hospital started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.