पुढील वर्षी मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:25+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सद्यस्थितीत काहीही अडचण नाही. नवीन पदनिर्मिती करून व प्रतिनियुक्तीने पदभरती करून गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय २०२१ पर्यंत सुरु होऊ शकते. त्याकरीता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. या कामात काही अडचण आल्यास कळवावे, ती अडचण दूर करू, असेही पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत सूचित केले.

Movements to start a medical college next year | पुढील वर्षी मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली

पुढील वर्षी मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय समितीच्या सदस्यांची भेट : पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मंगळवारी (दि.२१) पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत यासंदर्भात आढावा घेताना राज्यस्तरावरील समिती व आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे चर्चा केली. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध असल्याने समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे, प्रा.डॉ. राजेंद्र सुरपाम, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, महिला व बाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम आदी उपस्थित होते.
गडचिरोलीसारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी कोणतीही कमतरता राहता कामा नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना दिल्या. फेब्रुवारी महिन्यात डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने निरीक्षण करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक प्रस्ताव संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषद मुंबई यांना फेब्रुवारी २०२० मध्ये पाठविण्यात आला होता. त्याबाबतच्या अहवालावर मंगळवारी राज्यस्तरिय समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सद्यस्थितीत काहीही अडचण नाही. नवीन पदनिर्मिती करून व प्रतिनियुक्तीने पदभरती करून गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय २०२१ पर्यंत सुरु होऊ शकते. त्याकरीता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना यावेळी दिले. या कामात काही अडचण आल्यास कळवावे, ती अडचण दूर करू, असेही पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत सूचित केले.

मेडिकल कॉलेजसाठी या गोष्टींची गरज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी २५ एकर जागेची आवश्यकता आहे. पण गडचिरोलीत ३२ एकर जागा उपलब्ध आहे. बाह्यरूग्ण सेवा, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग तसेच इतर विभागासह २ व्याख्यान कक्षांची आवश्यकता आहे. त्यापैकी व्याख्यान कक्ष इमारतीचे बांधकाम करावे लागणार आहे. ३०० खाटांची आवश्यकता असताना सध्या ४०६ उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी ६० क्षमतेचे वसतिगृह आवश्यक असून तेही उपलब्ध आहे.महाविद्यालयासाठी १०३ मनुष्यबळाची पदनिर्मिती करावी लागणार आहे.

विद्युत विभागाचाही घेतला आढावा
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी विद्युत विभागाचीही आढावा बैठक घेतली. पावसाळ्यापूर्वी कृषी पंपाशी संबंधित कामे पूर्ण करावी, पंपांची लाईन दुरु स्त करण्यात यावी जेणेकरु न शेतकºयांना पावसाळयात त्रास होणार नाही. तसेच कृषी पंपाचा बॅकलॉग पूर्ण करण्याची सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन, तसेच प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्यात येऊन विहित मुदतीत कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळयापूर्वी वाढीव पोल लाईनची कामे पूर्ण करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
विद्युत पोल हे जंगलातून जात असल्यामुळे पावसाळयात विद्युत खंडीत होण्याचे प्रमाणे जास्त राहते. त्याकरीता विद्युत तारेला स्पर्श करणाऱ्या फांद्या छाटायला सुरुवात करावी. आता नवीन टेक्नॉलॉजीचे पाईप येत असून ते तुटत-फुटत नाही. ते लावण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम उपस्थित होते.

Web Title: Movements to start a medical college next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.