खासदार पोहोचले शेताच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:35+5:30
खा.नेते यांनी अमिर्झा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. परतीच्या अवकाळी पावसामुळे या भागातील धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धानपीक कापणीला आले असताना आठ दिवस आलेल्या पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले. तसेच वादळामुळे धानपीक खाली कोसळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, टेंभा व मरेगाव परिसरात परतीच्या व अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता खा. अशोक नेते शुक्रवारी भेट दिली. या परिसरातील नुकसानाचे सर्व्हेक्षण करून शासनाकडे अहवाल पाठवाव्या, अशा सूचना त्यांनी तहसीलदार, बीडीओ तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
खा.नेते यांनी अमिर्झा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. परतीच्या अवकाळी पावसामुळे या भागातील धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धानपीक कापणीला आले असताना आठ दिवस आलेल्या पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले. तसेच वादळामुळे धानपीक खाली कोसळले. खरीप हंगामात केलेला खर्चसुद्धा भरुन निघणे कठिण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तत्काळ कशी मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती देऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करणार असल्याचे अशोक नेते यांनी सांगितले. भेटीदरम्यान तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, जिल्हा महामंत्री भारत खटी, प्रशांत वाघरे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, बंडू झाडे, जि.प. सदस्य नीता साखरे व शेतकरी उपस्थित होते.