खासदारांनी घेतले विसापूर दत्तक
By admin | Published: November 10, 2014 10:42 PM2014-11-10T22:42:39+5:302014-11-10T22:42:39+5:30
‘खासदार दत्तकग्राम’ योजनेंतर्गत प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेत आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी
खासग्राममध्ये झाला कार्यक्रम : मतदार संघातील एक गाव दत्तक घेण्याचा पार पडला सोहळा
तळोधी (मो.) : ‘खासदार दत्तकग्राम’ योजनेंतर्गत प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेत आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी तालुक्यातील विसापूर हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तळोधी मो. पासून ५ किमी अंतरावर असलेल्या या गावात आज या संदर्भात सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री रामेश्वर सेलुकर, उपसरपंच बंडू नरोटे, पं. स. उपसभापती केशव भांडेकर, डॉ. भारत खटी, रवी बोमनवार, अशोक पोरेड्डीवार, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जयराम चलाख, विलास गण्यारपवार, आनंद गण्यारपवार, मनमोहन बंडावार, अब्बासभाई, अस्लम खान, संतोष तिवारी, ग्रामसेवक जयसिंग गावीत, विस्तार अधिकारी भैयाजी मुद्देमवार, पोलीस पाटील नंदा पेंदाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोनपाल सांबळे, उपाध्यक्ष रोहिदास भांडेकर, ग्रा. प. सदस्य राजू बारसागडे आदी उपस्थित होते.
खासदार निधीतून प्रत्येक वर्षाला एक गाव आदर्श करण्याचा संकल्प आहे. यात जनसहभाग आवश्यक आहे. विसापूर गावाला दत्तक घेऊन ५ लाखाचा निधी देण्याची घोषणा खा. अशोक नेते यांनी यावेळी केली. तसेच शौचालय बांधकामाचे महत्व, जनधन योजना याची माहिती ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. आपल्या लोकसभा क्षेत्रात २० तालुके आहेत. ७५० किमीचे अंतर कापून प्रत्येकांशी व्यक्तीगत संपर्क ठेवणे शक्य नाही. त्यामुळे जनतेच्या माध्यमातूनच आपल्या समस्या पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आनंद गण्यारपवार यांनी ग्रामस्थांना पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. तर संतोष तिवारी यांनी हागंदारीमुक्ती व केशव भांडेकर यांनी आरोग्यविषयक प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
विलास गण्यारपवार यांनी आम्लपदार्थाच्या दुष्परिणामाबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र पदा तर प्रास्ताविक व आभार बंडू नरोटे यांनी मानले. (वार्ताहर)