खासदारांकडून जखमी जवानांची विचारपूस
By admin | Published: June 2, 2016 02:58 AM2016-06-02T02:58:57+5:302016-06-02T03:00:28+5:30
वर्धा जिल्ह्याच्या पूलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला आग लागून १६ जवान शहीद झाले.
पुलगावची घटना : सावंगी येथे घेतली भेट
गडचिरोली : वर्धा जिल्ह्याच्या पूलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला आग लागून १६ जवान शहीद झाले. तर १९ जण जखमी झाले. यात जवानांचाही समावेश आहे. या जवानांना सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. या रूग्णालयाला गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी बुधवारी भेट देऊन जखमी जवानांची आस्थेने विचारपूस केली व एकूणच प्रकृतीची अवस्था जाणून घेतली.
यावेळी रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मेघे, विठ्ठलराव घडीनकर तसेच वर्धा येथील भाजप पदाधिकारी व वैैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलेल्या संपूर्ण जवानांची खा. अशोक नेते यांनी भेट घेऊन आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी मनोकामना केली.