खासदारांनी घेतला नगर परिषदेच्या कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:02 PM2018-10-11T23:02:09+5:302018-10-11T23:02:26+5:30

खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली नगर परिषदेच्या कामांचा गुरूवारी आढावा घेतला. आढावा बैठकीला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, महिला व बाल कल्याण सभापती रंजना गेडाम, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, नियोजन सभापती संजय मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, सतीश विधाते, भुपेश कुळमेथे, केशव निंबोड, प्रशांत खोब्रागडे, मुक्तेश्वर काटवे, अल्का पोहणकर, पुजा बोबाटे, वर्षा नैताम, वर्षा बट्टे, रितू कोलते, गीता पोटावी, मंजुषा आखाडे, लता लाटकर, अविनाश विश्रोजवार आदी उपस्थित होते.

MPs review the work of the Municipal Council | खासदारांनी घेतला नगर परिषदेच्या कामांचा आढावा

खासदारांनी घेतला नगर परिषदेच्या कामांचा आढावा

Next
ठळक मुद्देकामांबाबत सूचना : पाणी पुरवठ्याबाबत व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली नगर परिषदेच्या कामांचा गुरूवारी आढावा घेतला.
आढावा बैठकीला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, महिला व बाल कल्याण सभापती रंजना गेडाम, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, नियोजन सभापती संजय मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, सतीश विधाते, भुपेश कुळमेथे, केशव निंबोड, प्रशांत खोब्रागडे, मुक्तेश्वर काटवे, अल्का पोहणकर, पुजा बोबाटे, वर्षा नैताम, वर्षा बट्टे, रितू कोलते, गीता पोटावी, मंजुषा आखाडे, लता लाटकर, अविनाश विश्रोजवार आदी उपस्थित होते.
दीड वर्षांचा कालावधी उलटूनही गडचिरोली नगर परिषदेत विकासकामे सुरू झाली नाही. याबाबत खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नगर परिषदेला प्राप्त झालेला निधी परत गेल्याने खासदारांनी चिंता व्यक्त केली. सतत गैरहजर राहणाºया अधिकाºयांना नोटीस बजावून त्यांचे वेतन कपात करण्यात यावी. शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा मिळत नसल्याची बाब खासदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मोटारपंप जप्त करावी, असे निर्देश खासदारांनी दिली. त्याचबरोबर नगर परिषदेचे जुने गाळे खाली करून ते गाळे सुशिक्षीत बेरोजगारांना उपलब्ध करून द्यावे. ओपन स्पेसच्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्यात यावे.
राष्टÑीय महामार्गाचे काम या आठवड्यात सुरू होणार आहे. रस्त्यावर असलेले ईलेक्ट्रिक पोल तुटणार असल्याने त्याची व्यवस्था नगर परिषदेने करावी, असे निर्देश खासदारांनी दिले. गडचिरोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदारांनी दिल्या.

Web Title: MPs review the work of the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.