श्री. गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाला ‘इंडस्ट्री इंटरफेस’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:39+5:302021-04-26T04:33:39+5:30
दिल्ली येथील सेंटर फाॅर एज्युकेशन ग्राेथ अँड रिसर्च (सीईजीआर) संस्थेकडून १४ व्या राष्ट्रीय शिक्षण गाैरव पुरस्कार समारंभात आभासी प्रद्धतीने ...
दिल्ली येथील सेंटर फाॅर एज्युकेशन ग्राेथ अँड रिसर्च (सीईजीआर) संस्थेकडून १४ व्या राष्ट्रीय शिक्षण गाैरव पुरस्कार समारंभात आभासी प्रद्धतीने महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व्यक्ती, संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये यांना वेगवेगळ्या गटातील पुरस्कार सीईजीआर या संस्थेच्या वतीने मागील १३ वर्षांपासून दिले जात आहेत. श्री. गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाने दुर्गम व ग्रामीण भागात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राेजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन राेजागाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. याची नाेंद घेऊन सीईजीआर संस्थेने २०२०-२१ या वर्षीच्या ‘बेस्ट अंडर ग्रॅज्युएट काॅलेज ऑफ महाराष्ट्र फाॅर इंडस्ट्री इंटरफेस’ पुरस्कारासाठी श्री. गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाची निवड केली. काेराेना लाॅकडाऊनमुळे आभासी पद्धतीने प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे व सहकाऱ्यांनी हा पुरस्कार १९ एप्रिल राेजी स्वीकारला. प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे यांनी पुरस्काराचे श्रेय दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशाेधन संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील सहकारी आदींना दिले आहे. महाविद्यालयाला यापूर्वी राज्य सरकारचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, ग्रीन काॅलेज अवाॅर्ड, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार, नवी दिल्लीच्या इंटरनॅशनल बिझनेस काॅन्सिलचा गाेल्ड स्टार अवाॅर्ड, विद्यापीठाचा आदर्श महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट रासेयाे पथक पुरस्कार, उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
बाॅक्स
महाविद्यालयातील राेजगाराभिमुख उपक्रम
कुरखेडा येथील श्री. गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या राेजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने भारत सरकारच्या उन्नत भारत अभियानांतर्गत दत्तक गावातील शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, जलव्यवस्थापन कार्यशाळा, वैदू संमेलन, मृदसंधारण प्रशिक्षण आदींसह अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना राेजगाराचे प्रशिक्षण दिले जाते.