Video : लाल परीचे हाल-बेहाल, छताला गळती; चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:39 PM2023-08-25T13:39:07+5:302023-08-25T13:49:56+5:30

सामान्य प्रवाशाची लाल परी, दुर्लक्षामुळे झालीय जलपरी; चालकाने प्रवाशांचा जीव सांभाळावा की छत्री

MSRTC buses in worst condition; bus roof leak, driver handling bus steering in one hand while holding umbrella in other hand | Video : लाल परीचे हाल-बेहाल, छताला गळती; चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग

Video : लाल परीचे हाल-बेहाल, छताला गळती; चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग

googlenewsNext

गडचिरोली : चंद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. भारत चंद्रावर पोहोचलाय नवनवीन इतिहास रचतोय. पण, देशातील सामान्य नागरिकांच्या समस्या जैसे थेच आहेत. याची प्रचिती यापल्याला या व्हिडीओतून येईल. कालपापसून एसटी बसचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यात ड्रायव्हर चक्क एका हातात छत्री धरून दुसऱ्या हाताने बसचे स्टेअरिंग सांभाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया यावर उमटत आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते व त्यावर धावणाऱ्या लाल परीची स्थिती भयावह होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे काढणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र, सुधारणा, बदल असं काहीच होताना दिसत नाहीय. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील एका बसचे छत हवेत उडत असल्याचा प्रकार उजेडात आला होता. तर, त्यापूर्वी बसमधील छतावरून पावसाचे पाणी गळत असल्यामुळे प्रवासी सीटवर छत्री घेऊन बसून असल्याचा व्हिडीओदेखील समोर आला होता. तर, आता चक्क चालकच छत्री घेऊन दुसऱ्या हाताने बसचे स्टेअरिंग सांभाळताना दिसत आहे. या चालकाच्या एका हातात छत्री तर दुसऱ्या हाती चक्क प्रवाशांचे प्राणच असल्याचे यातून दिसून येते. हा व्हिडीओदेखील गडचिरोली जिल्ह्यातील असून यातून एसटी बसची स्थिती व प्रवाशांचे हाल 'बेहाल' असल्याचेच चित्र स्पष्ट होते. 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट करत सवाल उपस्थित केलाय. ''राज्यभरात सामान्य प्रवाशाची लाल परी सरकारच्या दुर्लक्षामुळे जलपरी झालीय. हे 'सामान्यांचं सरकार' आहे असं भासणाऱ्या सरकारला मात्र सामान्य माणसांविषयी काहीही देणंघेणं आणि seriousness नसल्याचंच यातून सिद्ध होतं. आता मविआ आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना ही गळणारी बस दिसेल काय?'' असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. ''भारत चांद पे और जनता गड्ढों में'' असे काहीसे चित्र या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एसटी बसची ही अवस्था कधी सुधारणार असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहे.

Web Title: MSRTC buses in worst condition; bus roof leak, driver handling bus steering in one hand while holding umbrella in other hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.